हिमालयाचा विर हणुमंतप्पाने अखेर भारत मातेचा निरोप घेतला सलग तेरा वर्ष भारतमातेच्या रक्षणासाठी आपले घरदार सोडून हिमालयात -४५ अंश सेल्सियस तापमानात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता भारतमातेचा हा वीर देशाचे संरक्षण करत होता.सहा दिवस तीस फुट खाली बर्फाच्या ढिगार्याखाली अडकलेल्या शूर हणुमंतप्पा च्या वीरतेला सलाम करून त्यांच्या पवित्र आत्म्यास सदासर्वदा शांती मिळो हिच प्रार्थना.
....................................................
हिंदूस्तान अबाधित राहिला पाहिजे माझा देश दुष्मणांपासून सुरक्षित राहिला पाहिजे या भावनेने हजारो युवक देशाच संरक्षण करण्याकरता मिलेट्रीत भरती होतात.कोण जम्मू काश्मिर मधे तर कोण पंजाबच्या सिमेवर तर कोण हिमालयातील बर्फाच्छदित भागामधे आपल्या देशाचं चोवीस तास संरक्षण करत असतो.एखादा तंबू,झोपडी टाकून आकाशालाच आपल पांघरूण समजून ते दिवस काढत असतात.भूक लागल्यावर कुठेतरी एखादी शेकोटी पेटवून काय असेल ते कच्चे-पक्के अन्न खावून देशाच्या इमानापोटी ते आपले दिवस काढत असतात.दुष्मण केंव्हाही आपल्यावर हल्ला करू शकतो या भावनेने ते सुखाची झोप ही घेऊ शकत नाहीत.दोन वेळेसच जेवण ही त्यांना वेळेवर मिळत नाही.देशाचा दुष्मण आपल्या देशात पाऊल ठेवता कामा नये माझ्या देशातले माय-बाप आया-बहिणी सुरक्षित राहिले पाहिजे त्यांना कोणत्याही अतिरेक्यांकडून धोका नाही झाला पाहिजे एवढच ध्येय उराशी बाळगून स्वत:चा जीव देशाच्या कार्याला ते अर्पण करतात.
....................................................
आज आपल्या घरातला एखादा माणूस मेल्यानंतर आपल्याला किती दुख: होतं.परंतू सिमेवर राजरोस पणे भारतमातेचे जवान शहिद होतात.त्यांनापण आई-वडील बायका-लेकरं असतातच मग त्यांना किती दुख:वाटत असेल.आज आपण जे सुखाचे दिवस पाहतो ते सिमेवर तैनात असणार्या जवानांमुळेच..
काही मुलं बापाने दिवसरात्र एक करून कमावलेल्या पैशावर उड्या मारतात,मस्ती करतात आणि मित्रांच्या संगतीने दारू पितात, एैयाशी करतात,कुठल्यातरी दिन दुबळ्या मुलाला चारचौघजण मिळून मारहान करतात हा बूळसटपणा समाजाला लागलेली महाभयंकर किड आहे.अरे मस्तीच दाखवायची असेल तर हातात ए के ४७ घेऊन देशाच्या दुष्मणांशी लढा,पाकिस्तानच्या अतिरेक्यांशी लढा..!दादागिरी गरीबांपाशी काय दाखवताय..! दादागिरी दाखवायचीच असेल पाकिस्तानच्या अतिरेक्यांना दाखवा, जिहाद्यांना दाखवा..!!!!
....................................................
एक जवान शहिद झाला तर आपण फक्त त्यांना श्रद्धांजलीच अर्पन करतो.राजकारणी लोकांना यांची काही दयामया वाटत नाही.लढणारे लढतात मरणारे मरतात आणि गादीवर सत्तेला चाटणारे अतिरेक्यांवर राजकारण करतात.अमिरेकेत कैद असलेला माफिचा साक्षीदार "डेव्हीड हेडलीने" इशरत जहॉंही सुसाईट बॉंम्बर होती अशी साक्ष नुकतीच दिली आहे.याच्यावरून इशरतला मुलगी माणणार्यांचा पुरता"पर्दाफाश" झाला आहे.
एकडे जवानांच्या अंतयात्रेला जाण्याची पुरसत नसणार्यांना गुलाम अलींचे तळवे चाटायला वेळ असतो यालाच भारतीय राजकारण्यांचा 'नासलेला धंदा' म्हटल तर वावग ठरणार नाही.
................................................
हे जावान तु आमच्यासाठी लढतो,आमच्या सुखासाठी तू स्वत:च्या सुखाचा त्याग करतो.भारतमातेसाठी तु जीव अर्पण करतो तुझे हे बलिदान निदान आम्ही सामान्य माणूस तरी कधीच विसरणार नाहीच... नाही.......
....... जय महाराष्ट्र जय हिंदूस्तान.......
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६
हिमालयाचा विर हणुमंतप्पाने अखेर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा