शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच व्हावी ....!

शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच  व्हावी ....!

      शिवजयंतीला धार्मिक व राजकीय स्वरुप देउ नये !

।। छत्रपति उद्यनराजे भोसले ।।

       भारतात सर्व थोर राष्ट्रभक्त-राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या ठरलेल्या तारखेनुसार होतात.
    छत्रपति शिवाजी महाराज हे ही थोर महापुरुष होऊन गेले .परंतु गेले काहि वर्ष शिवाजी महाराजांना मुद्दामुन बदनाम करण्याचा प्रयत्न काहि जन करीत आहेत .

     मग जेम्स लेनने पुस्तकाच्या माध्यमातून केलेले प्रकरण असो,अथवा शिवाजी महाराजांची जयंती असो प्रत्येक ठिकाणी त्यांच्या व्यक्तिरेखेवर शिंतोडे उडविन्याचे काम काहि समाज कंठक करीत आहेत.

     अशांना शासन करण्यासाठी आता शिवाजी महाराजांचे थेट तेरांवे वंशज उद्यनराजे भोसले यांनीच बाह्या सरसावल्या आहेत.
    
         ह्याचाच एक भाग म्हणुन शिवजयंती चा वाद पूर्ण पने मोडित काढण्याचा विडा उद्यनराजे भोसले यांनी उचलला आहे .

       त्यानी सितारा शहरात सर्व व्यापक अशी बैठक घेउन शासनाने ठरविलेल्या दिवशीच म्हणजेच १९ फेब्रुवारीला सर्वत्र शिवजयंती साजरी करण्याचे जाहिर केले.
     या व्यतिरीक्त शिवजयंती साजरी करुन शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्याच्यावर कायदेशिर कारवाइच शस्त्रच आता उद्यनराजे भोसले यांन उपसले आहे .

       या निमित्ताने त्यांनी चित्रलेखाचे डँनियन खुडे (सातारा) यांना दिलेली मुलाखत.
दिनांक :- 20/2/2006

प्रश्न  :- शिवजयंती तारखेला की , तिथिला हा वाद मुळात कोणी शुरु केला ?

उत्तर :- कालनिर्णयाच्या जयंत साळगावकरांनी तिथीचा मुद्दा उपस्थित करुन या वादाला सुरुवात केली आहे. जगातील आणि देशातील राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या ह्या तारखेनुसारच होतात महात्मा गांधी म्हाना ,अथवा टिळक म्हणा कोनाचीहि जयंती तिथिनुसार नसते ती तारखेलाच होते.तारखे वितिरीक्त कुणी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो .
      शिवाजी महाराज केवळ राष्ट्रपुरुष नव्हे तर युग पुरुष होते त्यांची जयंती वर्षातून तिन-तिनदा साजरी करुन त्यांचा अपमान करण्याच ता कुठेतरी थांबलच पाहिजे..

प्रश्न :- शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच हवी हे आपन कोनत्या आधारे म्हनतो ?

उत्तर :-शिवचरीत्राचे अत्यंत महत्वाचे सदर्भ ग्रंथ जेथे शिकवले कवी परमानंद लिखित शिवभारत या ग्रंथाचा आधार घेऊनच शासनाने नेमलेल्या इतिहासकारांच्या समितिने १९ फेब्रुवारी १६३० हि शिवरायांची जन्म तारख निश्चित केली आहे .
    शिवजयंतीचा तारीख तिथि वाद संपवा यासाठी महाराष्ट्र शासनाने  १९६६ मध्ये इतिहास संशोधक
डाँ.आप्पासाहेब पवार ,
वा.सी .बेंद्रे ,
न.र.फाटक,
ग.अ.खरे ,
द.वा.पोतदार ,
ब.मु.पुरंदरे,
     यांच्या समितीची स्थापना केली होती . या समितिने २००० मध्ये १९ फेब्रुवारी १६३० हि शिवजन्माची खरी तारीख शासनाला अहवालाद्वारे दिली..
       
      विधानसभेपुढे सादर करण्यात आलेल्या या अहवालावरुन शासनाने १९ फेब्रुवारी १६३० हि शिवजन्माची तारीख केली.लोकशाहित लोकांनी निवडून दिलेल्या सासनाचा निर्णय हा अंतिम मांडण्यात येतो.
    शासनाने शिवजयंतीच्या तारखेवरुन शिक्का मोर्तब केलाच आहे.
  आम्हि हि त्यांचे १३ वे वंशज म्हणुन याच तारखेला मान्यता देतो .
     गेल्या ५ वर्षापासुन तीन-तनदा शिवजयंती साजरी करण्याचा जो प्रकार चालला आहे . तो आता थांबवावा हि विनंती...

प्रश्न :- गेली ५ वर्ष आपन का गप्प होतात ?

उत्तर :- आपन लोकशाहिवर विश्वास ठेवतो अनेक जुन्या जानत्या इतिहास तज्ञांनी अभ्यास पुर्वक प्रस्ताव विधानसभेत सादर केला .तरी वाद संपला नाहि .या उलट तिथीसारखच तारीख तिथी वाद निर्माण करुण काहि जण त्यांचा राजकिय फायदा घेत असल्याचे जाणवू लागलं आता वाटतं या बाबत आपणहि बोललो नाहि तरी भावी पीढ़ी आपल्याला माफ करणार नाहि .
    त्यामुळे आता आम्हि गप्प बसनार नाहित.१३ वे वंशज म्हणुन आम्हि १९ फेब्रुवारी हा दिवस शिवजयंती म्हणुन मान्यता द्याव अशी आपल कळकळची विनंती आहे .

प्रश्न :- हा वाद चिघळत ठेवणारे कोण आहेत ?

उत्तर :- ह्यात विशेष करुन जयंत साळगावकरांचा पुढाकार आहे . त्यांनी चालु  वर्षाचा कालनिर्णयामध्ये शासकिय नियमानुसार परंपरेनुसार व तिथीनुसार अशा तिन प्रकारे शिवजयंती साजरी करण्याचे सुचविले.
    राष्ट्रीय अवमान करण्याचा प्रतिक्रियेत साळगावकर बसतात का ? या संदर्भात कायदेतज्ञांची चर्चा शुरु आहे.
    कायदेशिर सल्ला मसलत केल्यावरच त्यांच्यावरल कारवाईचा निर्णय घेण्यात येइल.

प्रश्न :- छत्रपति शिवरायांचे १३ वे वंशज म्हणुन आपले शिवभक्तांना काय आव्हान आहे ?

उत्तर :- छत्रपति शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज म्हणुन जवढे आमचे आव्हान आहे.
   तेवढेच प्रत्येक नागरिकांचेही आहे .त्यामुळे शिवजयंतीचा राजकिय,धार्मिक स्वरूप देऊन शिवजयंतीचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये ..

साभार आणि संकलन

छत्रपति उद्यनराजे भोसले
मुलाखत :- डँनियल खुडे (सातारा)
(चित्रलेखा दिनांक:- २०/०२/२००६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा