षंढ मी षंढ तू...
अन षंढ आपण सारे.
खुशाल आम्ही ऐकून घेतो
देशविरोधी नारे !
जीवावरति उदार होऊन
लढतो शूर जवान.
काळी माती कसून पिकवितो
धान्य गरीब किसान !
सीमेवरती शहिद होणारे
अश्रू नाही ढाळत.
कर्जबाजारी शेतकरी सुद्धा
देशविरोधी नाही बोलत ?
१० वी १२ वी पास वेडे
सीमेचे रक्षण करती.
पीएचडी करणारी तरणी पोर
गरळ विखारी उगळती !
कुणी मागतो आरक्षण
अन कुणी मागतो आझादी.
हिंदुस्तानात राहून सुद्धा...
स्वप्न हिंदुस्तानाची बरबादी !
वर्षश्राद्ध अफजलगुरुच
अन घोषणा पाकिस्तान जिंदाबाद.
काश्मीर, बंगाल अन केरळ का
होऊ पाहतय आता आझाद ?
भविष्य घडविण्या देशाचे
कर भरते जनता भोळी.
अनुदानावर चालणारी विद्यापीठ
मग का घडवतात अतिरेक्यांची टोळी ?
कुणा दिसते असहिष्णुता
कुणा जावस वाटत देश सोडून.
कसे झाले मग हे सुप्पर स्टार ?
सांगा एकदा गळा काढून !
कुणी परत दिले पुरस्कार
अन परत केला तो सन्मान.
साहित्यीकारांना आत्ताच कशी
जाग आली करण्या देशाचा अपमान ?
गोहत्या बंदीच
राजकारण कस दाटल..
हैद्राबाद साठी पहा
दलित राजकारण पेटल ?
गोर गरीबांचा न्याय कसा
तारखांवर तारखा घेतो.
याकुबसाठी मात्र आम्ही
मध्यरात्री न्यायालय उघडतो ?
इशरत साठी काही पक्ष
बिनधास्त पुरवितात पैसे !!
घोटाळेबाज आमुचे नेते
निवूडून येतात कैसे ?
शहीद होती पवनकुमार,
महाजन, महाडिक, अन हनुमंतप्पा.
४ दिवस चर्चिल्या जाती
देशप्रेमाच्या ढोबळ गप्पा !
मिडिया करते समर्थन
अन राजकारणी करतात पाठराखण.
देशप्रेम कस निर्मिणार आपण ?..
जिथ शेतपिक खातंय कुंपण !!
मतदान करून अभिमानाने
आम्ही करतो वर हात.
सरकार च्या माथी खापर फोडून
विकासाची मारतो बात.
अहो एकटा मोदी काय करील ?
आपण बसतो थंड !
कुठेही काहीही वाच्यता नाही
जेव्हा देशाविरुद्ध घडतंय बंड !
अफजल, कसाब, अन याकुब ठरतात
आयडॉल जेंव्हा त्यांचे.
सियाचीन,काश्मीर,लडाख सीमेवर
का जवान शहीद ते आमचे ?
याकुब साठी लिहिली जातात
राष्ट्रपतींना पत्र.
किती दिवस हे चालू राहील
आतंकवादाच सत्र ?
आपण का मग झोपून आहोत ?
वाट कशाची पाहतोय ?
देशद्रोह्यांना मोकाट सोडून
न्यायासाठी का रडतोय ?
व्हाटस अप, फेसबुक, इंटरनेट
वापरणारी हुश्शार आमची पिढी.
नाक्यावरती विषय चघळून
ओढत बसलोय बिडी.!
गर्लफ्रेंड ,जॉब, बियर,
विस्की, कार, आणि डिस्को
यातच आम्ही अडकून पडलोय
फिकर साला किसको ?
जवानांनी मात्र लढत राहव
आम्ही आहोत घरात सुखरूप.
हि तर विद्रोहाची नांदी आहे..
ज्याच पुढल भविष्य कुरूप !!
हिंदुस्तानाच्या अखंडतेला
आव्हान त्यांनी दिलंय.
उठा मर्दहो..आहे का कोणी
ज्यांन खऱ्या मायचं दुध पिलंय ?
आपण काय करणार आपण
लाचार कुटुंबाची आहे जबाबदारी
काही नाही तर निवेदन-पत्राद्वारे
भावना पोचवा सरकार दरबारी !!
मंदिरांवर घण बसले
महाराष्ट्र अस्मिता नंगी नाचवली अन नासवली
निर्मिण्या हिंदवी स्वराज्य
जिजाऊ मातेची कुस होती उजवली!
तोच शिवाजी म्हणे आजही
आमुच्या रक्तात सळसळतो.
देशाचा अपमान सहन करून
मग आम्ही दूर असे का पळतो ?
आफ्झुल्याचा कोतळा काढला
शाहिस्त्याची छाटली बोट
राजा अमुचा आम्ही विसरलो ..
सार सार वाटतय आता खोट!
थाटा माटात शिवजयंती करून
मराठी असल्याचा करतोय माज.
हीच काय शिकवण शिवरायांची ?...
राखुया थोडीतरी लाज !
कविता असली वाचून
रक्त झाल आमुच गरम.
४ दिवस गरम राहील
५ व्या दिवशी पडणार आम्ही नरम.!
देशद्रोही विचारांनी
पुकारलय आता बंड.
आम्ही मात्र असेच पडून
राहू खुशाल थंड !!
उत्तर याच एकाच मित्रा
मी षंढ तू षंढ..
अन आपण सारेच षंढ
गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६
षंढ मी षंढ तू..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा