डोळ्यातुन पानि नक्कि येइल.
➖➖➖➖➖➖➖
" बाबा मला वचन द्या !"
.....संध्याकाळची वेळ होती. बळीराम शेतातून आला असता घराच्या दारात त्याची मुलगी व मुलगा लाईट नसल्यामुळे चिमणी समोर घेऊन अभ्यास करत होते. हे पाहून बळीरामला बरे वाटले.आणि म्हणाला, 'पोरावो, खुप आभ्यास करा...! '
असे म्हणुन मुलांच्या आईला आवाज दिला आणि म्हणाला, 'अगं लक्ष्मी..! मला जेवायचं नाही हाय...! तु सकाळी दिलेल्या भाकरीनं पोट माझ टच झाल हाय...!'
असं म्हणत डेर्यातील पाणी पिण्यासाठी घरात गेला असता घरात समशानाची शांतता...! लक्ष्मी पण पाणी पेत होती. बळीराम म्हणाला, 'तु कोरभर भाकरी खायना !'
लक्ष्मी म्हणाली, 'घरात धान्याचा एक दाणा पण नाही हाय.... कशी बशी एक भाकरी केली हाय...! आणि ती भाकरी मुलांना ठेवली हाय...! ही भाकरी खाऊन पोरांना काय देणार म्हणुन कालची कोरभर भाकरी खाल्ली हाय...! धनी तुम्ही पण कालची कोरभर भाकर ठेऊन तीच आज खाल्ली हाय ते मला माहीत हाय ना...?'
बळीराम निशब्द झाला व काही काळ थांबुन म्हणाला, 'लक्ष्मी काय कराव...? पाऊस पाणी नाय हाय...! त्यामुळे शेताचं समशान झालं हाय...!
शेतात काहीच नाय हाय..? मग काय कराव मला समजत नाय हाय...!
आणि उद्या राखी पूनव पण हाय..! आणि पोरीला एक राखी आणुन देण्याची आयपत राहिली नाय...! काय कराव हे उमजत नाय हाय..?
देव शेतकर्यावर का कोपला हाय...? आणि कीती शेतकर्याचा बळी घेणार हाय..? काय माहीत..? शेतात गेल की पोटात कालवतंय..! काय करावं तेपण समजत नाय हाय..?'
म्हणून पोटभर पाणी पिऊन बळीराम बाहेर आला. आणि म्हणाला, 'पोरावो, बिगी बिगी चला... कोरभर भाकरी खावा...!'
दोन्ही पोर घरात आली...
त्यांना सुद्धा घरची परिस्थिती ठाऊक होती .म्हणून पोर नुसती भाकर खात होती . बळीराम घरात आला. त्याची मुलगी विद्याजवळ येवून बसला... विद्या म्हणाली, 'बाबा थोडं जेवा की...! बळीराम म्हणाला, 'आत्ताच तुझी आय आणि मी जेवलो हाय..!' पण विद्याला घरची परिस्थिती काय आहे याची पुर्ण जाण होती. त्यामुळे ह्या चिमुकलीनं ना स्वता घास घेतला...अन् त्यौ तीच्या बापाला भरवला..!
आणि बापाच्या डोळ्यातून पाणी आले...! स्वत:ला सावरत बाबा शांत झाला. विद्या म्हणाली, 'बाबा ऊद्या राखी पोर्णिम हाय. मला तुमच्या कडुन एक गोष्ट पाहिजे आहे ती तुम्ही देणार ना...? अशी म्हणाली असता बळीराम हो म्हणाला... आणि विद्या जेवण करुन झोपली...!
मात्र बळीराम जागाच होता.उद्या पोरगी काय मागतीया; या विचाराने तो कासावीस होता... रात्रभर तो बाप झोपला नाही.
सकाळ झाली आणि बळीराम अंघोळ करुन गावात गेला...
एक दोघाला हात ऊसने पैसे मागितले. परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे बळीराम हाताश झाला...
त्याला काय करावं हे समजत नव्हतं... राख्या घेण्यासाठी सुद्धा पैसे नसल्यामुळे राख्या कशा घेऊन जायच्या; या प्रश्नाने बळीराम व्याकुळ होता. आणि निराश होऊन घरी आला असता; विद्या ही घरी वाट पाहत बसली होती... बळीराम घरी आल्यावर विद्या म्हणाली, 'बाबा कीती वेळ झालं कुठं गेला होताव...? चला राखी बांधायची हाय...!' बळीराम म्हणाला, 'मी राखी आणली नाही हाय...?'
विद्या म्हणाली, 'माझ्याकडं राखी हाय.'
बळीराम अश्चयचकीत झाला आणि म्हणाला, 'तु राखी कोठून आणली हाय...? त्यावर विद्या म्हणाली, 'बाबा तुम्ही मागच्या वर्षी करदुडा आणला होता; तोच मी जपुन ठेवला होता. त्याच्या गोंड्याच्या मी दोन राख्या बनवल्या हायत...!
एक भैय्या ला बांधली अन् एक तुमच्या साठी ठेवली हाय...!
हात पाय धुवा आणि मग मी तुम्हाला राखी बांधते...!'
असे विद्या म्हणाली असता बळीराम गेला राखी बांधून घ्यायला.. परंतु त्याच्या मनात विचार होता, की पोरगी रात्रीच म्हणाली हाय, काय तरी मागणार हाय..? मात्र आपल्या जवळ दमडी पण नाही हाय...? काय करावं..? आणि पोरीला नाही म्हणालं तर... ही पोरगी जिवाला खाईल...! हा विचार बळीरामला सतावत होता. हात पाय पुसून तो पाटावर बसला आणि मुलीनं ओवाळले आणि राखी बांधली... आणि ती म्हणाली, 'बाबा मी जे मागीन ते देणार ना...? बळीराम हिम्मत करत म्हणाला, 'माग..? काय मागायच हाय ते माग...?
विद्या म्हणाली नक्की ना बाबा...! हे ऐकून बळीरामच्या ह्रद्यायाचे ठोके वाढले आणि म्हणाला बोल पोरी..!
विद्या म्हणाली, 'मला वचन द्या कशीबी परिस्थिती असना तुम्ही या परिस्थितीचा हिम्मतीने सामना करायचा...!
तुमच्या शिवाय आमचे कोण हाय या जगात...? दुष्काळाला खचुन आत्महत्या करायची नाय...? आणि मला आयुष्यभर साथ द्यायची ही ओवाळणी मला द्या...!' हे ऐकून बळीराम आणि लक्ष्मीच्या डोळ्यातुन आश्रु वाहू लागले... आणि बळीराम म्हणाला, 'होय पोरी...! मी दुष्काळाचा सामना करीन...! पण... पण आत्महत्या करणार नाही.' हे वचन बळीराम ने विद्या ला दिले. त्यावेळी विद्याला जगातील सर्वात अनमोल ओवाळणी मिळाल्याचा अनंद झाला. तिच्या चेहऱ्यावरून तसं दिसत होतं...!
आवडलं तर
दुःष्काळी किंकाळ्या हे सदर पुढे पाठवा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा