" दडलय गुपीत पानापानात"
तुळशीचे पान - विष्णूपदी स्थान ।
बेलाचे पान - शंकरचा मान ॥
केवड्याचे पान - नागाचे स्थान ।
रुईचे पान - मारुतीला छान ॥
केळीचे पान - भोजनाशी छान ।
नागिणीचे पान - गोविंदविड्याला छान॥
मेंदीचे पान - शकुनाचा मान ।
पळसवडाचे पान- द्रोणपत्रावळी छान ॥ पिंपळाचे पान - मुंजाचे स्थान ।
गुलाबाचे पान - काटेरी छान ॥
कढीपत्त्याचे पान - फोडणीत स्थान ।
आळूचे पान - अळूवडीला छान ॥ तमालपत्राचे पान - मसाल्याची शान ।
वहीचे पान - लिहायला छान ॥
पुस्तकाचे पान - माहितीची खाण ।
गवताचे पान - दवबिंदू शोभायमान ॥ ओव्याचे पान - सुवासिक छान ।
त्याला भजीत - मान ॥
तुळशीचे पान - स्मरणिशक्तीला महान । आपट्याचे पान-त्याला सुवर्णांचा मान॥
आंब्याचे पान - तोरणाची शान|
त्याला शुभ कार्यांत - मान
--------- ---------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा