गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

दगड

एका सद्गृहस्थाच्या घरात एक दगड होता . तो अनेक कामी यायचा. म्हणून त्याने तो ठेवला होता.
     दरवाजा अपोआप पुढे जाऊ लागला कि त्याला दरवाजाला लावायचा, मुलांना काही खेळायचे असल्यास तोच दगड, घरात कुत्र आल सौभाग्यवतींनी फेकून मारला, अशा असंख्य कामाला यायचा म्हणून तो दगड खितपत घरात पडला होता.
      वापरून वापरून त्याची झीज झाली होती आणी गोल घुमट झाला होता.
       एक दिवस त्या सद्गृहस्थांच्या घरी एक पाहुणे आले . सहज नजर पडली त्या दगडावर. पडली तर त्याची झीज होऊन होऊन एका बाजूने थोडा चमकत होता . सराफ कुळातील असल्याने त्यांनी परीक्षण केले आणी म्हणाले काय हो हे इतका मौलिक रत्न तुम्ही घराच्या दाराला अडसर म्हणून उभ केलंत ?
       न समजून त्या सद्गृहस्थाने त्यांना प्रश्न उलट प्रश्न केला. ते  रत्नपारखी म्हणाले , अहो खरंच हा साधा सुधा दगड नसून अलौकिक रत्न आहे . ते आज त्याची किंमत १० कोट च्या घरात तरी असेल ... 
      झाले !!!  दगडाचे जीवनच बदलले . खसकन त्या गृहस्थाने तो दगड पाहुण्यांच्या हातून खेचला आणी तिजोरीत ठेवला. 
      मग कालपर्यंत नीच कामासाठी वापरत येणारा हा दगड आत्ता अलौकिक रत्न बनून तिजोरीत राहत होता !

दृष्टांत संपला आत्ता सिद्धांत .....

        नरदेह हा सुद्धा त्याच दगडा सारखा आहे.  तुम्ही आम्ही त्याला उगीच खितपत ठेवला आहे . नको त्या कमाल लावला आहे.
       मग एक दिवस सद्गुरुंसारीखा रत्नपारखी भेटला आणी मग त्याने या नरदेहाची किंमत दाखवली आणी नंतरच त्याला तिजोरी प्राप्त झाली.
 
      म्हणून म्हणतो,  परमार्थाला आपण तोवर लागत नाही ; जोवर या जन्माची किंमत कळत नाही ...आणी जोवर ती कळत नाही तोवर परमार्थाचा अधिकारी नाही होऊ शकत.
       ती जाणून घ्या आपण कशाला मनुष्य जन्माला आलोय आणी काय करतोय ,याच चिंतन करा ...

     शेवटी काय;  रत्न बनून तिजोरीत राहायचं कि खितपत जन्मोंजन्मी दरवाजाला पडत राहायचं , इतरांच्या हातातलं खेळण बनायचं हे ज्याच त्याने ठरावावं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा