येत्या शुक्रवारपासून '२०१६' या नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. या वर्षात काय घडणार आहे, या वर्षाची वैशिष्ट्ये काय. याविषयी पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेली ही विस्तृत माहिती...
•✨यावर्षी ३६६ दिवस
२०१६ हे वर्ष लीप वर्ष असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस आहेत. त्यामुळे हे वर्ष ३६५ ऐवजी ३६६ दिवसांचे असेल. त्यामुळे आपल्याला एक जास्त दिवस काम करण्याची संधी मिळणार आहे.
•✨मकर संक्रांत १५ जानेवारीला
मकर संक्रांती दरवर्षी १४ जानेवारीला येते असा आपला समज आहे. पण, प्रत्यक्षात तसे नसते. मकर संक्रांतीचा दिवस पुढे जात असतो. नव्या वर्षी मकर संक्रांती १५ जानेवारीला येणार आहे.
•✨रविवारला धरून सुट्ट्या
मार्च, एप्रिल, ऑगस्ट, ऑक्टोबर महिन्यात सलग चार दिवस सुट्या आल्याने चाकरमान्याना बाहेरगावी जायची संधी मिळेल. या सुट्या रविवारला जोडून येत आहेत.
•✨गणपती लवकर येणार!
नव्या वर्षी गणेशाचे आगमन दहा दिवस अगोदर म्हणजे पाच सप्टेंबर रोजी होत आहे. गौरींसोबत विसर्जन होणाऱ्या गणपतींचा मुक्काम सहा दिवसांचा असणार आहे.
•✨गुरुपुष्यामृत योग
सन २०१६मध्ये १४ एप्रिल, १२ मे, ९ जून, असे तीन दिवस गुरुपुष्यामृत योग सुवर्ण खरेदीसाठी येत आहेत.
•✨एकही अंगारकी नाही!
संकष्टी चतुर्थी मंगळवारी न आल्याने नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी चतुर्थी नाही.
•✨खगोलीय घटना...
> बुधवार, ९ मार्च रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण पूर्व भारतातून दिसणार आहे. मुंबई पुण्यातून दिसणार नाही.
> बुधवार, २३ मार्च रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण रात्री ७-२५ पूर्वी चंद्रोदय होईल तेथून दिसेल.
> सोमवार, ९ मे, बुधाचे अधिक्रमण - बुध ग्रह ज्यावेळी सूर्यबिंबावर आलेला दिसतो त्याला 'बुधाचे अधिक्रमण' म्हणतात. नूतन वर्षी बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार आहे. सोमवार, ९ मे रोजी सायंकाळी ४.४४ वाजता बुध ग्रह सूर्यबिंबावर येईल. तो सूर्यबिंबावरून बाहेर पडण्यापूर्वीच सायंकाळी ७.३ वाजता सूर्यास्त होईल. हे दृश्य साध्या डोळ्यांनी पाहू नये. जाणकारांच्या मदतीने दुर्बिणीच्या साहाय्याने सूर्याची प्रतिमा पांढऱ्या कागदावर पाडून त्यामध्ये हे दृश्य पाहावे. सूर्यबिंबावर बुधाची काळी तीट लावलेले दृश्य दिसेल. हे बुधकृत सूर्यग्रहणच असेल. यानंतर ११ नोव्हेंबर २०१९ रोजी बुधाचे अधिक्रमण होईल.
> १८ ऑगस्ट रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण आणि एक सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
> १६ सप्टेंबर रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.
•✨विवाह मुहूर्त
सन २०१६मध्ये वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. १ मे रोजी मुहूर्त आहे. नंतर शुक्र अस्त असल्याने उर्वरित मे-जून मध्ये मुहूर्त नाहीत.
•✨पाऊस समाधानकारक
जुन्या ठोकताळ्याप्रमाणे पर्जन्य नक्षत्रे-वाहने पाहता सन २०१६ मध्ये पाऊस समाधानकारक पडेल.
इंग्रजी 2016 वर्षाचे स्वागत✨
नववर्ष तुम्हाला सुख़-समृद्धि आणि भरभराटीचे जावो✨✨✨✨
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा