कुटुंबातील आईवडिलांनी उपाशी राहून आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलंही अभ्यासात हुशार, दोघांनी शिक्षण घेऊन अमेरिकेत उच्च नोकरी मिळवली. अनेक लटपटी करुन अमेरिकेतच आपले बस्तान बसवले. दोघांनीही अमेरिकन मुलींशी लग्न करून संसार थाटला. आता भारतात येणं दुर्मिळ झालं.
अशातच आई गेल्याची वार्ता दोघांनाही पोहोचली. धाकटा मुलगा उशिरा सर्व सोपस्कार झाल्यावर गावी पोहोचला.
दोनच दिवसांनी बाबांच्या हातात लाख रुपये ठेवले व म्हणाला, "बाबा मी निघतो, आज रात्रीची फ्लाईट आहे."
बाबा न राहवून बोलले, "अरे, तू आलास पण तुझा दादा ?"
"त्याचं काय आहे बाबा, मी दादाला फोन केला, मात्र वर्कलोडमुळे त्याला शक्य नव्हते...! त्यामुळे तोच म्हणाला, या वेळी तू जा.. बाबांच्या वेळी मी जाईन...!"
बाबा काहीच बोलले नाहीत ...!!!
म्हणून आपल्या मुलांना उच्च शिक्षणासोबत मानुसकी शिकवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा