*छत्रपती शाहू महाराज*
*अधिकारकाळ* -इ.स.१८८४ - इ.स.१९२२
*राज्याभिषेक* - २ एप्रिल इ.स.१८९४,
*राज्यव्याप्ती* -कोल्हापूर जिल्हा
*राजधानी* -कोल्हापूर
*पूर्ण नाव* - यशवंत आप्पासाहेब घाटगे
*जन्म* -२६ जून इ.स.१८७४ कागल, कोल्हापूर
*मृत्यू* -६ में इ.स.१९२२ मुंबई
*पूर्वाधिकारी* -चौथे शिवाजी
*वडील* -आपासाहेब घाटगे
*आई* - राधाबाई
*राजघराणे* -भोसले
*राजर्षी शाहू महाराज* हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. *१८८४-१९२२* सालांदरम्यान छत्रपती होते.
शाहू महाराजांचा *२६ जून* हा जन्म दिवस *‘सामाजिक न्याय दिवस’* म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात *शिक्षणप्रसार* करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
*स्त्री शिक्षणाचा* प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.
*अस्पृश्यता नष्ट* करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.
*जातिभेद दूर* करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
इ.स. १९१७ साली त्यांनी *पुनर्विवाहाचा कायदा* करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे *‘डेक्कन रयत असोसिएशन’* ही संस्था स्थापली.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी *संस्था* कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता.
राधानगरी *धरणाची उभारणी*, शेतकऱ्यांना *कर्जे उपलब्ध* करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी *कृषिविकासाकडे लक्ष* पुरवले.
त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या *शिक्षणासाठी,* तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही *सहकार्य* केले होते.
त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या *कलावंतांना राजाश्रय* देऊन *प्रोत्साहन* दिले.
अशा या *लोककल्याणकारी* राजाला *जयंतीनिमित्त* कोटी कोटी *प्रणाम*...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा