वटपौर्णिमा !!!
काय आहे *७* जन्माचे रहस्य?
उद्या वटपौर्णिमा. *७* जन्म हाच पती मिळवा
यावरून खूप विनोद होत आहेत. पण हे सगळेच अज्ञान मूलक आहेत.
मुळात या *७* जन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही. तो होणार का नाही? माहित नाही. माणसाचा मिळेल का? माहित नाही. हीच पुन्हा ओळखायची कशी? अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत.
मग काय आहे *७* जन्म?
ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे.
शरीरविज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते.
काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात. शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते.
या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो *१२* वर्षे.
म्हणून तप करायचे *१२* वर्षे.
*१२* वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलत असते. जणू एक नवा जन्म.
असे सात जन्म म्हणजे *१२×७=८४.*
पूर्वी लग्न होत *१६* व्या वर्षी.
त्यावेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो अर्थात पती _*१६+८४=१००*_ वर्षे जगो !!!
पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म.
पुढच्या जन्माचा काहीही संबंध नाही.
वटसावित्रीच्या शतायुत्वाच्या शुभेच्छा.
(विद्यावाचस्पती श्री. स्वानंद पुंड यांच्या विवेचनावरून !!!))
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा