*प्रत्येक एटीएमधारकांना 5 लाखापर्यंतचे विमा कवच
आजकाल प्रत्येकाकडेच कोणत्या ना कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड असते. पण तुम्हाला हे माहित आहे का ? तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डमुळे 5 लाखांचे विमा संरक्षणदेखील मिळालं आहे. कोणतीही बँक तुम्हाला ही माहिती देणार नाही. पण वास्तविक, बँकेने तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डसोबत 25 हजार ते 5 लाखांचा विमा उतरवलेला असतो. ही योजना गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण 90 ते 95 टक्के एटीएमधारकांना याची माहिती देखील नाही.
या योजनेनुसार, जर तुम्हाला एखाद्या अपघातात अपंगत्व आले, किंवा तुमचा मृत्यू झाला तर बँकेला तुम्हाला विविध नियमांनुसार नुकसान भरपाई द्यावी लागते. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून कोणताही हप्ता द्यावा लागत नाही. पण याची माहिती तुम्हाला तुमची बँक कधीही देत नाही.
*किती मिळते नुकसान भरपाई ?*
जर तुमच्याकडे कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड आहे, तर त्या बँकेकडून तुम्हाला 1 लाखांचं अपघाती विमा संरक्षण मिळते. तसेच जर तुमच्याकडे मास्टर कार्ड असेल तर बँक तुम्हाला 2 लाखांचा अपघात विमा देते. याशिवाय एखाद्या दुर्घटनेत तुम्हला तुमचा एखादा पाय किंवा हात गमवावा लागला असेल, तर बँकेकडून तुम्हाला 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळते. तसेच तुम्हाला पूर्ण अपंगत्व आल्यास बँकेकडून तुम्हाला एक लाख नुकसान भरपाई मिळते.
*एटीएमच्या प्रकारानुसार विमा कवच*
मास्टर कार्डधारकांना 50 हजारांचं, तर क्लासिक एटीएम कार्डधारकांना 1 लाखांचे विमा कवच मिळतं. तसेच सर्व वीज कार्डधारकांना दोन लाख रूपयांचे तर मास्टर मित्र कार्डधारकांना 25 हजारांचे विमा संरक्षण असतं. या शिवाय प्लॅटिनम कार्डला दोन लाख, तर मास्टर प्लॅटिनम कार्डधारकांना 5 लाखांचे विमा संरक्षण असतं.
*आपल्या हक्काविषयी जागृक व्हा!*
त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेशी तत्काळ संपर्क साधून तुमच्या एटीएमविषयी माहिती जाणून घ्या! आणि जर बँक नकार देत असेल, तर बँक अधिकाऱ्यांना सरकारकडून माहिती उपलब्ध असल्याची माहिती द्या. जर एखाद्या एटीएमधारकाचा अपघाती मृत्यू झाला असल्यास बँकेकडून नुकसान भरपाईची तत्काळ मागणी करा. बँक जर नकार देत असेल, तर तुम्ही बँकेविरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागू शकता.
सर्वसाधारणत: तुम्हाला तुमच्या अधिकारांविषयी माहिती नसल्याने बँक या अपघाती विम्यांचा परतावा देत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या अधिकारांविषयी जागृक व्हा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा