जागतीक रक्तदान दिन
--------------------------------
१४ जुन हा स्वैच्छिक जागतीक रक्तदान दिन आहे।
रक्तदानाबद्दल लोकांमध्ये बर्यापैकी जागृती झाली असून, मागील अनेक वर्षात ऐच्छिक रक्तदात्यांचे प्रमाण बदली रक्त देणार्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढले आहे. सिकलसेल, थॅलेसेमिया, बाळंतपण, गंभीर अपघात अथवा कोणत्याही पद्धतीची शस्त्रक्रिया म्हटले की पहिली आवश्यकता भासते ती म्हणजे रक्ताची, आणि रक्ताची निर्मिती कोणत्याही कारखान्यात होऊ शकत नाही. कारण रक्त कृत्रिम पद्धतीने तयार करता येऊ शकत नाही. ते उपलब्ध करून घ्यावे लागते केवळ मानवी शरीरातूनच. यावरूनच रक्तदान किती महत्त्वाचे आहे याचा आपण अंदाज घेऊ शकतो. १८ वर्षांवरील कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते.
रक्तदानाबद्दल सामान्य जनतेत काल्पनिक भीती असून रक्तदान केल्याने एखादा आजार अथवा शारीरिक थकवा येऊन आपण आजारी पडू अशा भ्रामक कल्पना लोक बाळगून असतात. म्हणूनच सरकारचा आरोग्य विभाग जनतेत व अनेक सामाजीक संस्था रक्तदानाबद्दल जागृती व्हावी यासाठी विविध योजना तयार करून जनजागृती करीत असतो.
ऑस्ट्रिया चे जीवशास्त्रज्ञ व भौतीकशास्त्रज्ञ डॉ कर्ल लेण्डस्टाईनर यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. डॉ कार्ल यांचा जन्म १४ जुन १८६८ व म्रुत्यु २६ जुन १९४३ रोजीचा आहे.
१९३० साली शरिरविज्ञानातील संशोधन बाबत त्यांना नोबेल पारितोषीक मिळाले आहे.
यांनी रक्ताचे वर्गीकरण करुन त्याचे गट तयार केले.
१९९७ साला पासुन या दिवशी रक्तदान दिन साजरा केला जातो.
२००५ साली विश्व आरोग्य संघटना ( WHO) ने हा दिवस जागतीक रक्तदान दिन म्हणुन घोषीत केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा