रविवार, १३ मार्च, २०२२

प्रथम पुण्यस्मरण - पुष्पाताई भागवत गुरव

*ताई.....💔*
आज पूर्ण १ वर्ष झाले ताई , १ वर्ष ताई , आयुष्याच्या वाटेवर मला तुम्ही एकटं सोडून गेलात...आयुष्याची सुरवात झाली ती तुमच्या सोबतच लहानपणा पासून तुम्ही आम्हा सर्व भाऊ-बहिणींना एका आई प्रमाणे सांभाळले , स्वतः उपाशी पोटी झोपून आम्हा भाऊ-बहिणीच्या पोटाची खळगी भरायचे. तेव्हा पासून माझ्या आयुष्याला तुमच्या आधाराची साथ भेटली. नंतर ताई, आपल्या छोट्याश्या परिवाराला सुरवात झाली आणि थोडे आनंदाचे क्षण येताच पुन्हा दुःख आपल्या दारी आलं पण तेव्हा एका खंबीर आधारप्रमाणे तुम्ही आपल्या घराची धुरा सांभाळली.
कोणा पुरुषाला सुद्धा लाजवेल असे कर्तृत्व आणि नेतृत्व तुम्ही केले, घर सांभाळत असताना आपल्या मुलावर हवे ते संस्कार केले घरच्या परिस्थितिची जाणीव करून दिली.  आणि पुन्हा एक वेळा आयुष्याच्या गोड क्षणाला आणि आनंदाला सुरवात झाली , आपले घर स्वर्गा सारखे झाले होते आणि तेव्हा परत काळाने आपल्यावर आपल्या आनंदावर घाला घातला.  ताई, काही न कळू देता , काही न समजू देता आपले होत्याचे नव्होते झाले...ताई तुम्हाला ह्या दुर्दैवी नशिबाने आमच्या पासून हिरावून नेले.   ताई तुमच्याविना आम्ही आयुष्यचा विचार सुद्धा केला नव्होता , तुमचं अस सोडून जाणं खूप मोठं दुःख देऊन गेलं ताई, आपलं घर तुमच्या विना पोरकं आहे आम्ही आमचं आयुष्य तुमच्याविना शून्य आहे ताई. तुमच अस हे जाण आम्हाला आयुष्यभरासाठी चटका देऊन गेला.
ताई आमच्या आयुष्यात तुमची कमी नेहमी भासत होती, भासत आहे आणि भासत राहीणार.
तुमची खूप आठवण येते ताई

*भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💔*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा