रविवार, ३१ जुलै, २०१६

गंध मुक्ति ला सफ़ेद चन्दन का लावतात ?

गंध मुक्ति ला सफ़ेद चन्दन का लावतात ?

"मोक्षिका " या ग्रंथानुसार -

सात पिढ़यापर्यन्त घरण्याशी नातेसंबंध असणारे सपिण्ड असते आणि ज्या दिवशी व्यक्ति वारते त्या दिवसापासून ते तेराव्या दिवशी गंधमुक्ति करण्याची शास्त्रात मान्यता आहे आणि गंधमुक्ति च्या दिवशी सफ़ेद गंध लावन्या मागचे कारण असे की जीवन आणि मृत्यु या दोन्ही देहाच्या संगिनी आहेत आणि त्या व्यक्तिवरील प्रेम आणि मोह या मनाच्या संगिनी आहे त्यामुळे इतर लोकांची मानसिकता त्या गेलेल्या व्यक्तीच्या मगोवा घेत विचलित झालेली असते त्याचे मन आणि चित्त स्थिर रहावे म्हणून कपाली श्वेत चन्दन लावला जातो हिरण्य कश्यप चा नृसिंह भगवान ने वध केल्यानंतर त्याची धर्मपत्नी आक्रोश करत असताना नृसिंह भगवान ने तिच्या मनातील भाव ओळखले  तिचे सुद्धा देवानी प्राण घ्यावे अशी ति प्रार्थना करीत होती तोच भक्त प्रल्हाद त्यांच्या मातोश्री ला समजवित असताना त्यांच्या मातोश्री त्यांच्यावर संतप्त झाल्या आणि आपल्या मुलामुळे आपले पति मारले गेले अशी भावना त्यांच्या मनात येत असलेली नृसिंह देवाने ओळखली आणि आपल्या कपाली असलेले श्वेत चन्दन तिच्या कपाली लावतच तिचे मन शांत स्थिर झाले आणि मनातील द्वेष  क्रूरतेचा क्षय झाला हा चंदनचा टीका देवाने तेराव्या दिवशी लावून तिला मुक्ति दिली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा