शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

राष्ट्रीय ग्राहक दिन

*भारतात *24*  *डिसेंबर हा* *दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून* *साजरा होत असतो*.

*भारतात याच दिवशी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला*.

*त्यामुळे हा दिवस ग्राहकांच्या संरक्षणाचा*,

*त्यांच्या हक्काचा, *त्यांच्या अधिकारांचा म्हणून गणला जात आहे. परंतु एक दिवसाचा दिन साजरा करून ग्राहकांचे प्रश्‍न सुटणार आहेत का*?

*त्यासाठी संबंधित संस्था, संघटना, शासन, प्रशासन आणि मुख्य म्हणजे समाज कोणत्या नजरेनं पाहतो, काय करू शकतो*?

*हे जाणून घ्यावे लागेल. ग्राहक हा बाजारातील राजा असल्याचे सातत्याने सांगितले जाते. *पण तो औट घटकेचा राजा आहे. त्यानंतर तो कायमचाच गुलाम झालेला असतो*.

*ही परिस्थिती बदलायची असेल तर ग्राहकाने स्वतःची निराशावादी भूमिका बदलायला हवी*.

*ग्राहक कोण राजा की गुलाम*?

बाजारात गेल्यानंतर दुकानदार आपल्याला अशा प्रकारे वागवतात की तो सन्मान पाहून आपल्या डोळ्यात अभिमानानं पाणीच यावं.

खरंतर तो आपल्याला उल्लू बनवत असतो.
आणि त्याहूनही खरं म्हणजे तो दुकारदारही याच समाजातला याच यंत्रणेचा एक भाग असतो. त्याला आपला माल खपवायचाच असतो. त्यामुळे तो आपल्याशी गोड बोलून व्यवहार करत असतो.

आपण स्वतःला त्या क्षणी राजा महाराजा असल्याचे समजतो. नंतर पैसे देऊन वस्तू घेऊन तिथून निघतो. त्याच वेळी ते महाराजापण संपलेलं असतं. त्या दुकानात पुन्हा गेलात तर पहिल्यासारखी ट्रीटमेंट मिळेलच याची खात्री कोणी देणार नाही. कारण, आता दुकानात आलेले नवे ग्राहक तिथला औट घटकेचा राजा झालेले असतात. 

ग्राहकांना उत्तम सेवा मिळाली  पाहिजे, असे वारंवार सांगितले जाते. पण भेसळ, महागाई, टंचाई, पैशाची चणचण, खरेदीतली अपरिहार्यता या आणि अशा अनेक कारणांमुळे उत्तम तर सोडाच, सेवाही कोणी देत नाही. त्यामुळे भारतीय बाजारपेठा आता राजाशिवाय, राजाला देण्यात येणार्‍या महत्त्वाशिवाय फुलताहेत.

आता तुम्ही या, काय  पाहिजे ते घ्या, पैसे द्या आणि फुटा अशी मानसिकता बाजाराची झाली आहे. त्यात सुपरमार्केट आणि मॉल्ससारखी तांत्रिक बाबींना जास्त महत्त्व देणारी सुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीचे जनरल स्टोअर, ठरलेले दुकान, घरच्यांची चौकशी करणारा दुकानदार वगैरे संकल्पना काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

या गोष्टी केवळ वस्तू खरेदीपुरत्या नसून आता तर कर, वीज बिले, गॅस देयके, स्टेशनरीपासून ते अगदी मोबाइल रिचार्जपर्यंत अनेक गोष्टींमध्ये कृत्रिमता आली आहे. सध्या कॅशलेसचा जमाना आल्याची हाकाटी पिटली जात आहे. ऑनलाइन व्यवहारांना गती आली आहे. त्यामुळे ग्राहक व विक्रेत्यांचे सलोख्याचे संबंध आता दुरावले गेले आहेत.

याही परिस्थितीत ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचा दावा अनेक उत्पादक, विक्रेते, दुकानदार, वितरक वगैरे करत असतात. घराच्या खरेदीपासून ते चप्पलच्या शिलाईपर्यंत सगळीकडे केवळ भुलवण्याचा उद्योग सुरू आहे. आजकाल प्रॉडक्ट सेलिब्रेटी, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, लोगो, रजिस्ट्रेशन, फ्रँचाईजी, सब-ब्रँच वगैरे शब्दांनी ग्राहकांना मोहात पाडले जात आहे. खाद्यपदार्थ, कपडे, अन्न-धान्य, जिन्नस, दैनंदिन वापराच्या वस्तू, देयके, कर वगैरे सगळीकडे मोहमायेचा पसारा मांडलेला आहे. त्यातून सूट, सवलत, यावर ते फ्री वगैरे प्रलोभने आहेतच.

ती काही वाईट नाहीत.

पण, ग्राहकांची मानसिकता एकाच गोष्टीभोवती फिरवत नेण्याचा हा फंडा काहीसा चुकीचा आहे. ग्राहक अकारण नको त्या वस्तू खरेदी करून पैसे उडवत असतो किंवा गुंतवत असतो. त्याला वेळेचे, वस्तूचे, पैशाचे व नियोजनाचे भान राहत नाही. 

आजकाल ऑनलाइन वस्तू खरेदीवर भर दिला जात आहे. लोकांना मार्केटमध्ये जाऊन वस्तू खरेदी करायला सवड नाही.

ते मोबाइल किंवा संगणकावरून इंटरनेटच्या माध्यमातून बाजारहाट करतात. ज्या वस्तू हाताळल्या नाहीत, त्या खरेदी केल्या जातात. त्या वस्तू कुरिअरने येतात.

अनेकदा त्यांची काही गॅरेंटी नसते.

कपडे, दागिने, मोबाइल, पुस्तके, भेटवस्तू वगैरेंची खरेदी ऑनलाइनवर मोठ्या प्रमाणात होते. अनेकदा लोक त्या वस्तू घेऊन फसतात.

तक्रार दाखल केली की उत्पादक, विक्रेते, कुरिअरवाले एकमेकांकडे बोट दाखवून आपली बाजू सावरून धरतात.

म्हणजे ग्राहकाला फसवले जाते. 
कित्येकदा वस्तूंवर कंपनीची नोंदणी नसते, उत्पादक नोंदणी, वस्तूच्या निर्मितीची तारिख, एक्स्पायरी डेट वगैरे काही नसतं.

विशेषतः अन्न-धान्याच्या बाबत असे आढळते. अशा वेळी ग्राहकांनी सावध राहून या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये कित्येकदा भेसळ आढळते.

त्या भेसळीमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खाद्यान्नांच्या वेष्टनांवरील माहिती ही महत्त्वाची असते. ती वाचून घेतली पाहिजे. घाईघाईत वस्तू खरेदी करणे हानीकारक ठरू शकते.

जाहिरातीत जे म्हटलं आहे, ते जाणून घ्या. तशाच प्रकारचं उत्पादन आपण खरेदी केलं आहे की नाही, ते तपासा. म्हणजे नुकसान होणार नाही. 

जाहिरातीत आपले आवडते स्टार असतात. त्यांचं म्हणणं हे आपल्यासाठी नसतंच. ते त्या कामाचे पैसे घेत असतात. आपण मात्र सतर्क राहिले पाहिजे. नुकसान झाले तरी आपण गप्प बसतो. ते चुकीचे आहे. तक्रार करायला कचरू नका. त्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यान्वये अनेक मार्ग आहेत. संकेतस्थळं आहेत. ती जाणून घ्या.

*राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

हळद आणि कुंकू यांचे पूजेतील महत्त्व...

हळद आणि कुंकू यांचे पूजेतील महत्त्व...

१) हळदी ला स्वतः चे एक सुंदर सुगंध असते.
वातावरणातील देवी देवतांच्या दैवी लहरी  सर्वात जास्त आकर्षित करण्याची शक्ती हळदी मध्ये असते.
हळदी मुळे दैवी उर्जेतील रज-तम घटकांचे सक्रिय वलय निर्माण होते.
हि दैवी उर्जा या वलयाच्या  आसपास च्या वातारणात पसरते.
हळदी मध्ये पृथ्वी चे मूळ घटक जास्त प्रमाणात आढळतात.
यामुळे हळदी च्या सुगंधाद्वारे हि उर्जा आसपास च्या वातावरणात पसरते.हळदी मध्ये पृथ्वी चे Frequencies जास्त प्रमाणात आढळतात. तसेच यात श्री गणपतीतत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे.

2) कुंकू: शुद्ध कुंकू हे हळदी पासून च बनवले जाते. या कुंकू चा रंग एकदम च लाल किंवा रक्तासारखा लाल आजिबात नसतो. हा किंचित डार्क नारंगी रंगाप्रमाणे असतो.
कुंकू मध्ये आढळणारी दैवी उर्जा त्याचा भोवती तयार झालेल्या सक्रिय वलया भोवती फिरत असते.यातून च कुंकू मध्ये आढळणारे चैतन्य आसपास च्या वातावरणात पसरते.
देवी देवतांना लावलेल्या कुंकू मधून सतत दैवी उर्जे चे उत्सर्जन होत असते म्हणून च कुंकू ला स्वतः चे असे एक आध्यात्मिक महत्त्व आहे.
कुंकू हे हळदी पासून बनविले जाते म्हणून च साहजिक च यात पृथ्वी चे Frequencies जास्त प्रमाणात आढळतात.
लाल रंग श्री दुर्गा देवी ला अत्यंत प्रिय आहे.
कुंकू च्या लाल रंगामुळे यात श्री दुर्गा देवीतत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते.
म्हणून च कोणत्याची देवी च्या कुम्कुमार्चना पूजे साठी शुद्ध कुंकू वापरणे इष्ट ठरते.
कुंकू मधील दैवी उर्जे मुळे उपासाकाच्या/ साधकाचे मानसिक शुद्धीकरण होते.कपाळावर कुंकू लावल्याने नकारात्मक उर्जा आपल्या पासून दूर राहतात.
म्हणून च स्त्री ने कपाळावर कुंकू लावणे इष्ट मानले जाते.

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा माहिती

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा माहिती

दि 31-10-2016 रोज सोमवार बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतॊ. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पती आणि माहेरच्या व सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

बलिप्रतिपदेला भगवान विष्णुंच्या वामन अवताराची पूजा करतात. बळी हा असुर राजा होता. त्याला त्याच्या पदाचा खूप गर्व झाला होता त्याला त्याच्या अहंकाराची शिक्षा देण्यासाठीच भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याला पाताळ लोकी पाठविले. काही समाज कंटक श्री विष्णुंच्या वामनावताराने गर्वहरण केलेल्या बळीला शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणतात परंतु शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणजे खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम हा आहे त्याची हत्यारे सुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहे.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी
अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र
काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे
म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात
कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा
करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली
जाते. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी
विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त
आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही
नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून
व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या
कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द-खतावणीच्या
नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता
वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला
औक्षण करते व पती पत्‍नीला ऒवाळणी घालतो.
नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात.
ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो
त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच
असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो
शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ
नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल
तसे वागू लागतात. बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा
भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा
लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे
म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले,
‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे
आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी
वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व
पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने
‘‘तिसरा पाय कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा
म्हणाला, ‘‘तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय
त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून
वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे
त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व
राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले
टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य
म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्‍याला यमयातना होऊ
नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास
करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि
कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

लक्ष्मी पूजनासाठी शास्त्र संमत अशी नक्की वेळ कोणती ?*

*लक्ष्मी पूजनासाठी शास्त्र संमत अशी नक्की वेळ कोणती ?*

दिवाळीत आश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन नक्की कधी व कोणत्या वेळी करावे याविषयी अनेक प्रकारे संभ्रम उत्पन्न करणारे संदेश पसरविले जात असतात. धर्मशास्त्रानुसार विचार केल्यास दिवाळीतील अमावस्येस करण्यात येणारे लक्ष्मी पूजन हे फक्त प्रदोषकाळातच करावे असे सांगितलेले आहे. पुराणात स्पष्ट सांगितले आहे "दीपान्दत्वा प्रदोषे तु लक्ष्मीं पूज्य यथाविधि" अर्थात प्रदोषकाळातच लक्ष्मीपूजन करावे.
प्रदोषकाळ म्हणजे सूर्यास्तानंतरच्या ६ घटिका म्हणजे अंदाजे २ तास २४ मिनिटांचा कालावधी होय.या प्रदोषकाळातच म्हणजे *सायंकाळी अंदाजे ६.०० ते सायंकाळी ८.३०* या वेळेतच लक्ष्मी पूजन करावे.लक्ष्मी पूजनासाठी लाभ,अमृत,शुभ या प्रकारचे चौघडिया मुहूर्त पाहू नयेत .चौघडिया मुहूर्त हा फक्त यात्रेसाठी बघायचा असतो पण हल्ली सर्रास तो लक्ष्मी पूजनासाठी घेतला जात आहे,जे योग्य व धर्मशास्त्रसंमत नाही.तसेच लक्ष्मीपूजनासाठी राहुकाळ, स्थिरलग्न, अभिजित् मुहूर्त यांसारख्या  बिनबुडाच्या गोष्टी बघू नयेत. *प्रदोषकाळातच लक्ष्मी पूजन करावे व देवी लक्ष्मीची कृपा संपादन करावी*

*सूर्यसिद्धांतीय पंचांगकर्ते*:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रसंमतीने *पं.गौरवशास्त्री देशपांडे-
|| *यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग* ||
|| *सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग* ||

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

!! दिपावली मुहूर्त पत्रिका !!

*IIश्री गजानन प्रसन्न II*
*IIश्री महालक्ष्मी प्रसन्न II*
शालिवाहन शके १९३८ 
विक्रम संवत-२०७२-२०७३

*!! दिपावली मुहूर्त पत्रिका !!*

*धनत्रयोदशी :*
मिती आश्विन कृष्ण त्रयोदशी शुक्रवार  दि.२८/१० २०१६ रोजी धनत्रयोदशी आहे.
शुक्रवार  दि.२८/१० २०१६       सकाळी ६=३४ ते ७=५९ चंचल
सकाळी ७=५९ ते ९=२६  लाभ
सकाळी ९=२६ ते १०=५२ अमृत
दुपारी १२=१८ ते १=४४ शुभ
दुपारी ४=३६ ते ६=०२ चंचल
रात्रौ  ९=१० ते १०=४४  लाभ
रात्रौ १२=१८ ते १=५२  शुभ
रात्रौ १=५२ ते ३=२६  अमृत

*लक्ष्मीकुबेर पूजन:*
मिती आश्विन कृष्ण अमावास्या रविवार दि,३०/१०/२०१६  रोजी लक्ष्मीकुबेर पूजन करावे.
रविवार दि,३०/१०/२०१६          सकाळी ८=०१ ते ९=२६  चंचल
सकाळी ९=२६ ते १०=५२ लाभ
सकाळी १०=५२ ते १२=१८ अमृत
दुपारी १=४४ ते ३=१० शुभ
सायंकाळी ६=०१ ते ७=३६ शुभ
रात्रौ ७=३६ ते ९=१०  अमृत
रात्रौ ९=१० ते १०=४४  चंचल
रात्रौ १=५२ ते ३=२७  लाभ
पहाटे ५=०१ ते ६=३५ शुभ
( गोरज मुहूर्त सायंकाळी ५=५७  ) { सिंह लग्न रात्रौ १=२३  ते ३=३१  }

*बलिप्रतिपदा :*
मिती कार्तिक शुक्ल प्रतिपदा शके १९३८ विक्रम संवत २०७३ सोमवार दि.३१/१०/२०१६ रोजी आहे. या दिवशीही वहीपूजन करता येते.
सोमवार दि.३१/१०/२०१६ सकाळी ६=३५  ते ८=०१ अमृत
सकाळी ९=२७ ते १०=५२ शुभ
दुपारी १=४४ ते ३=०९ चंचल
दुपारी ३=०९ ते ४=३५  लाभ
दुपारी ४=३५ ते ६=०१ अमृत
सायंकाळी ६=०१ ते ७=३५ चंचल
रात्रौ १०=४४ ते १२=१८  लाभ
रात्रौ १=५३ ते ३=२७   शुभ
**काटा लावण्यासाठी शुभ मुहूर्त **
सकाळी ६=३५  ते ८=०१  अमृत

*II शुभं भवतु II*
�� *शुभ दिपावली*��

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

मनरुपी मित्र (बालसंस्कार)*

*मनरुपी मित्र (बालसंस्कार)*

मित्रांनो , आपल्या सामर्थ्यशाली मनाबरोबर आपल्याला मैत्री करायची आहे . हा मनरुपी मित्र आपल्या बरोबर २४ तास असतो .

आपण त्याला जे - जे सांगू ते - ते तो आपल्या जीवनात साकार करतो . तो आपल्या सुख - दुःखांना संबंधित असतो .किंबहुना आपल्या सुख - दुःखांना तोच कारणीभूत असतो .

या मनरुपी मित्राच्या साथीने आपलं जीवनशिल्प जर सुंदर , सुबक करायचं असेल तर आपल्याला काय बरं केलं पाहिजे ?

त्यासाठी मनाला आवरायला हवं , मनाला सावरायला हवं , मनाला सजवायला हवं , अन मनाला जोडायला हवं ! म्हणजे काय ? पाहू या !

*१) मनाला आवरायचं केव्हा ?* तुम्ही मुलं कधी - कधी नको त्या गोष्टी प्रमाणाबाहेर करता . तिथे मनाला आवरा . उदा . काॕम्प्युटर गेम , मोबाईलवरील गेम , टी . व्ही . पाहणं इ .

*२) मनाला सावरायचं म्हणजे काय ?* मनाला फोकस करता आलं पाहिजे . उदा . अभ्यास करताना विशिष्ट कालावधीत अभ्यासाचा विशिष्ट टप्पा ठरवून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा .

*३) मनाला सजवायचं कसं ?* तर सतत चांगले , आनंदी , सुखाचे , यशाचे विचार मनात घोळवत ठेवायचे . आतापर्यंत माझं चांगलं झालं आणि यापुढेही चांगलंच होणार अशा सकारात्मक विचारांनी मनाला सजवायचं .

*४) मनाला जोडायचं ! कुणाशी अन् कसं ?* मनाला जोडायचं सर्वांशी ! माळेतले मोती जसे एका समान धाग्यात गुंफलेले असतात तसे विश्वातले आपण सर्व जण एका मनरुपी धाग्याने नकळतपणे जोडलेलो आहोत .

या सर्वांबद्दल सतत शुभ विचार , शुभ चिंतन करुन त्यांच्याशी आपल्याला जोडायचंय . त्यासाठी *' विश्वप्रार्थनारुपी '* सुवर्ण विचार *' सदगुरु श्री वामनराव पै '* ह्यांनी दिलेला आहे . हा सुवर्ण विचार सतत मनात घोळवत ठेवला की विश्वातील प्रत्येकाशी आपले नाते दृढ होत जाते .

असे हे मनरुपी सामर्थ्यशाली उपकरण जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला मिळालेलं आहे . ज्ञानाच्या अधिष्ठानावर जेव्हा आपण या मनाशी संबंध जोडतो तेव्हाच आपलं जीवनशिल्प सुंदर घडतं !

बुध्दीच्या जोरावर माणूस चंद्रावर पोहोचला . अनेक शोध त्याने लावले . माणसाकडे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे ते बुध्दीमुळेच ! अशी ही बुध्दी परमेश्वराने दिली आणि ती वापरण्याचं स्वातंत्र्य देखील दिलं !

त्या बुध्दीचा चांगला वापर करुन जीवनशिल्पाला चांगला आकार द्यायचा आणि त्यातूनच ती अधिकाधिक तीक्ष्ण अन् सूक्ष्म करायची की तिचा वापर करायचाच नाही हे कुणी ठरवायचे ?

म्हणूनच जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते ,               *' तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !'*

              *(जीवनविद्या मिशन)*

��������������������������������

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

देवी नवरात्र


देवीचे शारदीय नवरात्र जवळ आले आहे त्याबद्दल आपण धर्मशास्त्रीय माहिती आज पाहुयात                                              
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास *शारदीय नवरात्र* असे म्हणतात.                               
  नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पळाला गेला पाहिजे .  आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे , त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.   अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम रावण युद्धातही  रावणाच्या वधा साठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते.        
 
*नवरात्र व्रताचे प्रकार:-*  
१)प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र
२) प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत
३) पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत 
४) सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत         .                                                          
 
*नवरात्रीचे अंगे:-*
 नवरात्रीचे प्रमुख ४ अंगे आहेत.
*१) देवता स्थापन
२) माला बंधन
३) नंदादीप (अखंड दीप)
४) कुमारिका पूजन*
    हि आहेत.काही जणांकडे (वेदिका) शेत स्थापना करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून  त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत. नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी .तेलाची जोडवात एक वित लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात. नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाम मंत्राचा १०८/१००८ जप करावा किंवा विष्णूसहस्रनाम वाचावे .                   
 नवरात्रात माला बंधन करताना (माळ बांधताना)त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी .                                       
*कुमारिका पूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे*                       
शक्य असल्यास नवरात्र संपे पर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे.                       
 *स्कंद पुराणात तिच्या वया नुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत.*                                               *२ वर्षाची- कुमारी /
३वर्षाची -त्रिमूर्तीनी /
४ वर्षाची -कल्याणी /
५वर्षाची - रोहिणी /
६ वर्षाची -काली /
७ वर्षाची -चंडिका /
 ८ वर्षाची -शांभवी /
९ वर्षाची - दुर्गा / व
१० वर्षाची - सुभद्रा*  
                       ,   ,                                                
 *कुमारिका पूजनाचे फळ पुढील प्रमाणे:-- 
१ कुमारिका पूजन- ऐश्वर्य प्राप्ती /
२ कुमारिका पूजन-- भोग व मोक्ष प्राप्ती /
३ कुमारिका पूजन -- धर्म व अर्थ प्राप्ती /
४ कुमारिका पूजन-- राज्यपद प्राप्ती /
५ कुमारिका पूजन-- विद्या प्राप्ती /
६ कुमारिका पूजन--षट् कर्म सिद्धी /
 ७ कुमारिका पूजन---राज्य प्राप्ती /
८ कुमारिका पूजन--संपत्ती /
 ९ कुमारिका पूजन--पृथ्वीचे राज्य मिळते.*
            नवरात्रात सप्तशती  पठणाचे विशेष महत्व आहे . सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नी सामान आहे.मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करिन. सर्व शांतिकर्म - - दुःस्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील  असे देवी माहात्म्य सांगते. राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे. अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते , तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात.
*नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ,ते पुढील प्रमाणे:-*      
 रविवारी -पायस(खीर) /
सोमवारी -गायीचे तूप /
 मंगळवारी -केळी /
बुधवारी -- लोणी /
गुरुवारी --खडीसाखर /
शुक्रवारी -- साखर /
शनिवारी --गायीचे तूप .......      
          नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र वाचन /महालक्ष्मी अष्टक / कनकधारा स्तोत्र /रामरक्षा / देव्यपराध स्तोत्र / श्रीसूक्त /शुलिनीदुर्गा सुमुखी स्तोत्र इत्याद स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे व जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा
.१)सात्विक अन्नाचे सेवन (शक्यतो परांन्न वर्ज्य करावे)
२) ब्रम्हचर्य पालन ३) दाढी व कटिंग करू  नये
४) गादीवर पलंगावर न झोपणे .
*नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो.*     
 *।।इति धर्मशास्त्र निर्णय:।।* 
              *।।जय श्रीराम।।*
                                         
 

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखांक १ ते २

प्रश्न : - *आत्मा जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे ,त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय* ???
असे म्हणतात त्यांना खुप वेगवेगळे प्रवास असतात ,त्यामधे आपण सारखे आठवण काढत राहीलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो...
कृपया नक्की काय असते समजावलेत तर बरे होईल ...
 
 || मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
[ *लेखांक १ ला* ]
प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे.
         यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते, शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करतात, आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात . अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ .
अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थ असा आहे की , मेलेल्या वेक्तिला संबोधुन मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे सर्व पहात असतो. तेंव्हा त्या मंत्राचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहीलेला नाहि तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे म्हणतात . आता आम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळुन टाकणार आहोत असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात, जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेवुन प्रेताला अपसव्य म्हणजे डावि प्रदक्षिणा घालतो , यावेळेस एका दगडाने खांद्यावरिल मडक्याला एक भोक पाडतात , अशा तिन प्रदक्षिणा करुन प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छाद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात तेव्वा त्या माठाचा फ sss ट् असा आवाज होवुन तो फुटतो यालाच घटस्फोट असे म्हणतात .( आता नवरा जिवंत किवा बायको असतानाच घटस्फोट घेतला जातो ) या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथुन जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामधे बांधतात याला अश्मा असे म्हणतात . त्या नंतर प्रेताळा जाळले जाते .
   आत्मा हे सगळं पहात असतो , त्याला आपला देह जळताना पाहुन वाईट वाटते , त्याला रडायला येते , ( येथे आशी कुणी शंका घेवु नये की आत्मा रडतो का ? तर आत्मा अजुनही चार कोषामधे बद्ध आहे व यात मनोमय कोष असल्यामुळे वासना , भावना असतात ) प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो , तो आत्माही आपल्या सोबत घरी येतो मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात , दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो.
घरात दक्षिणेकडे कडे तोंड करुन दिवा लावला जातो याला नमस्कार करुन आलेली मंडळी निघुन जातात.घरातिल माणसं अंघोळ करुन पिढलभात खायला मोकळी होतात ........
पुढे काय होते ...?
क्रमश....
पुढील लेखात पाहू
 
 || मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
 
|| *लेखांक दुसरा* ||
 
कालच्या लेखात आपण पाहीले की, प्रेताला अग्नी देऊन सगळे घरी येतात, अश्मा घराबाहेर ठेवतात , आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघुन जातात व घरातील मंडळी पिठलं भात खावुन दुःख करित बसतात . पुढे------++--
अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर , गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात असा सर्वदूर समज आहे पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे.लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याचि प्रक्रिया आहे ती आपण पुढे पहाणार आहोत.
आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतिक आहे, आत्ता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक , आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात कारण दहा दिवस आत्मा घराबाहेच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो.
त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक , मित्र मैत्रीणी, परिवार भेटायला येतात, घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्ती बद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडले की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पहात असतो , ऐकत असतो.आपल्या बद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो हे सगळं त्याला कळत आसतं त्यामुळे त्याला खुप दुःख होतं व रडायला येतं .
या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थीचं विसर्जन वहात्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातुन कलशासगट करावं .
दहाव्या दिवशी त्या अश्म्याला घेवुन घाटावर जातात तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे म्हणजे दाढी मिशा व डोक्यावरील केस काढावेत , या घाटावर जो विधि केला जातो
तो म्हणजे काय असतो ? या आत्म्याचा प्रवास कसा सुरु होतो व त्याचे पुढे काय होते ते उद्या पाहु ****
क्रमशः -
 
राष्ट्रीय कीर्तनकार
*हभप श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी*