रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

लक्ष्मी पूजनासाठी शास्त्र संमत अशी नक्की वेळ कोणती ?*

*लक्ष्मी पूजनासाठी शास्त्र संमत अशी नक्की वेळ कोणती ?*

दिवाळीत आश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन नक्की कधी व कोणत्या वेळी करावे याविषयी अनेक प्रकारे संभ्रम उत्पन्न करणारे संदेश पसरविले जात असतात. धर्मशास्त्रानुसार विचार केल्यास दिवाळीतील अमावस्येस करण्यात येणारे लक्ष्मी पूजन हे फक्त प्रदोषकाळातच करावे असे सांगितलेले आहे. पुराणात स्पष्ट सांगितले आहे "दीपान्दत्वा प्रदोषे तु लक्ष्मीं पूज्य यथाविधि" अर्थात प्रदोषकाळातच लक्ष्मीपूजन करावे.
प्रदोषकाळ म्हणजे सूर्यास्तानंतरच्या ६ घटिका म्हणजे अंदाजे २ तास २४ मिनिटांचा कालावधी होय.या प्रदोषकाळातच म्हणजे *सायंकाळी अंदाजे ६.०० ते सायंकाळी ८.३०* या वेळेतच लक्ष्मी पूजन करावे.लक्ष्मी पूजनासाठी लाभ,अमृत,शुभ या प्रकारचे चौघडिया मुहूर्त पाहू नयेत .चौघडिया मुहूर्त हा फक्त यात्रेसाठी बघायचा असतो पण हल्ली सर्रास तो लक्ष्मी पूजनासाठी घेतला जात आहे,जे योग्य व धर्मशास्त्रसंमत नाही.तसेच लक्ष्मीपूजनासाठी राहुकाळ, स्थिरलग्न, अभिजित् मुहूर्त यांसारख्या  बिनबुडाच्या गोष्टी बघू नयेत. *प्रदोषकाळातच लक्ष्मी पूजन करावे व देवी लक्ष्मीची कृपा संपादन करावी*

*सूर्यसिद्धांतीय पंचांगकर्ते*:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रसंमतीने *पं.गौरवशास्त्री देशपांडे-
|| *यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग* ||
|| *सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग* ||

1 टिप्पणी: