शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

राष्ट्रीय ग्राहक दिन

*भारतात *24*  *डिसेंबर हा* *दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून* *साजरा होत असतो*.

*भारतात याच दिवशी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला*.

*त्यामुळे हा दिवस ग्राहकांच्या संरक्षणाचा*,

*त्यांच्या हक्काचा, *त्यांच्या अधिकारांचा म्हणून गणला जात आहे. परंतु एक दिवसाचा दिन साजरा करून ग्राहकांचे प्रश्‍न सुटणार आहेत का*?

*त्यासाठी संबंधित संस्था, संघटना, शासन, प्रशासन आणि मुख्य म्हणजे समाज कोणत्या नजरेनं पाहतो, काय करू शकतो*?

*हे जाणून घ्यावे लागेल. ग्राहक हा बाजारातील राजा असल्याचे सातत्याने सांगितले जाते. *पण तो औट घटकेचा राजा आहे. त्यानंतर तो कायमचाच गुलाम झालेला असतो*.

*ही परिस्थिती बदलायची असेल तर ग्राहकाने स्वतःची निराशावादी भूमिका बदलायला हवी*.

*ग्राहक कोण राजा की गुलाम*?

बाजारात गेल्यानंतर दुकानदार आपल्याला अशा प्रकारे वागवतात की तो सन्मान पाहून आपल्या डोळ्यात अभिमानानं पाणीच यावं.

खरंतर तो आपल्याला उल्लू बनवत असतो.
आणि त्याहूनही खरं म्हणजे तो दुकारदारही याच समाजातला याच यंत्रणेचा एक भाग असतो. त्याला आपला माल खपवायचाच असतो. त्यामुळे तो आपल्याशी गोड बोलून व्यवहार करत असतो.

आपण स्वतःला त्या क्षणी राजा महाराजा असल्याचे समजतो. नंतर पैसे देऊन वस्तू घेऊन तिथून निघतो. त्याच वेळी ते महाराजापण संपलेलं असतं. त्या दुकानात पुन्हा गेलात तर पहिल्यासारखी ट्रीटमेंट मिळेलच याची खात्री कोणी देणार नाही. कारण, आता दुकानात आलेले नवे ग्राहक तिथला औट घटकेचा राजा झालेले असतात. 

ग्राहकांना उत्तम सेवा मिळाली  पाहिजे, असे वारंवार सांगितले जाते. पण भेसळ, महागाई, टंचाई, पैशाची चणचण, खरेदीतली अपरिहार्यता या आणि अशा अनेक कारणांमुळे उत्तम तर सोडाच, सेवाही कोणी देत नाही. त्यामुळे भारतीय बाजारपेठा आता राजाशिवाय, राजाला देण्यात येणार्‍या महत्त्वाशिवाय फुलताहेत.

आता तुम्ही या, काय  पाहिजे ते घ्या, पैसे द्या आणि फुटा अशी मानसिकता बाजाराची झाली आहे. त्यात सुपरमार्केट आणि मॉल्ससारखी तांत्रिक बाबींना जास्त महत्त्व देणारी सुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीचे जनरल स्टोअर, ठरलेले दुकान, घरच्यांची चौकशी करणारा दुकानदार वगैरे संकल्पना काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

या गोष्टी केवळ वस्तू खरेदीपुरत्या नसून आता तर कर, वीज बिले, गॅस देयके, स्टेशनरीपासून ते अगदी मोबाइल रिचार्जपर्यंत अनेक गोष्टींमध्ये कृत्रिमता आली आहे. सध्या कॅशलेसचा जमाना आल्याची हाकाटी पिटली जात आहे. ऑनलाइन व्यवहारांना गती आली आहे. त्यामुळे ग्राहक व विक्रेत्यांचे सलोख्याचे संबंध आता दुरावले गेले आहेत.

याही परिस्थितीत ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचा दावा अनेक उत्पादक, विक्रेते, दुकानदार, वितरक वगैरे करत असतात. घराच्या खरेदीपासून ते चप्पलच्या शिलाईपर्यंत सगळीकडे केवळ भुलवण्याचा उद्योग सुरू आहे. आजकाल प्रॉडक्ट सेलिब्रेटी, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, लोगो, रजिस्ट्रेशन, फ्रँचाईजी, सब-ब्रँच वगैरे शब्दांनी ग्राहकांना मोहात पाडले जात आहे. खाद्यपदार्थ, कपडे, अन्न-धान्य, जिन्नस, दैनंदिन वापराच्या वस्तू, देयके, कर वगैरे सगळीकडे मोहमायेचा पसारा मांडलेला आहे. त्यातून सूट, सवलत, यावर ते फ्री वगैरे प्रलोभने आहेतच.

ती काही वाईट नाहीत.

पण, ग्राहकांची मानसिकता एकाच गोष्टीभोवती फिरवत नेण्याचा हा फंडा काहीसा चुकीचा आहे. ग्राहक अकारण नको त्या वस्तू खरेदी करून पैसे उडवत असतो किंवा गुंतवत असतो. त्याला वेळेचे, वस्तूचे, पैशाचे व नियोजनाचे भान राहत नाही. 

आजकाल ऑनलाइन वस्तू खरेदीवर भर दिला जात आहे. लोकांना मार्केटमध्ये जाऊन वस्तू खरेदी करायला सवड नाही.

ते मोबाइल किंवा संगणकावरून इंटरनेटच्या माध्यमातून बाजारहाट करतात. ज्या वस्तू हाताळल्या नाहीत, त्या खरेदी केल्या जातात. त्या वस्तू कुरिअरने येतात.

अनेकदा त्यांची काही गॅरेंटी नसते.

कपडे, दागिने, मोबाइल, पुस्तके, भेटवस्तू वगैरेंची खरेदी ऑनलाइनवर मोठ्या प्रमाणात होते. अनेकदा लोक त्या वस्तू घेऊन फसतात.

तक्रार दाखल केली की उत्पादक, विक्रेते, कुरिअरवाले एकमेकांकडे बोट दाखवून आपली बाजू सावरून धरतात.

म्हणजे ग्राहकाला फसवले जाते. 
कित्येकदा वस्तूंवर कंपनीची नोंदणी नसते, उत्पादक नोंदणी, वस्तूच्या निर्मितीची तारिख, एक्स्पायरी डेट वगैरे काही नसतं.

विशेषतः अन्न-धान्याच्या बाबत असे आढळते. अशा वेळी ग्राहकांनी सावध राहून या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये कित्येकदा भेसळ आढळते.

त्या भेसळीमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खाद्यान्नांच्या वेष्टनांवरील माहिती ही महत्त्वाची असते. ती वाचून घेतली पाहिजे. घाईघाईत वस्तू खरेदी करणे हानीकारक ठरू शकते.

जाहिरातीत जे म्हटलं आहे, ते जाणून घ्या. तशाच प्रकारचं उत्पादन आपण खरेदी केलं आहे की नाही, ते तपासा. म्हणजे नुकसान होणार नाही. 

जाहिरातीत आपले आवडते स्टार असतात. त्यांचं म्हणणं हे आपल्यासाठी नसतंच. ते त्या कामाचे पैसे घेत असतात. आपण मात्र सतर्क राहिले पाहिजे. नुकसान झाले तरी आपण गप्प बसतो. ते चुकीचे आहे. तक्रार करायला कचरू नका. त्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यान्वये अनेक मार्ग आहेत. संकेतस्थळं आहेत. ती जाणून घ्या.

*राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा