शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

मनरुपी मित्र (बालसंस्कार)*

*मनरुपी मित्र (बालसंस्कार)*

मित्रांनो , आपल्या सामर्थ्यशाली मनाबरोबर आपल्याला मैत्री करायची आहे . हा मनरुपी मित्र आपल्या बरोबर २४ तास असतो .

आपण त्याला जे - जे सांगू ते - ते तो आपल्या जीवनात साकार करतो . तो आपल्या सुख - दुःखांना संबंधित असतो .किंबहुना आपल्या सुख - दुःखांना तोच कारणीभूत असतो .

या मनरुपी मित्राच्या साथीने आपलं जीवनशिल्प जर सुंदर , सुबक करायचं असेल तर आपल्याला काय बरं केलं पाहिजे ?

त्यासाठी मनाला आवरायला हवं , मनाला सावरायला हवं , मनाला सजवायला हवं , अन मनाला जोडायला हवं ! म्हणजे काय ? पाहू या !

*१) मनाला आवरायचं केव्हा ?* तुम्ही मुलं कधी - कधी नको त्या गोष्टी प्रमाणाबाहेर करता . तिथे मनाला आवरा . उदा . काॕम्प्युटर गेम , मोबाईलवरील गेम , टी . व्ही . पाहणं इ .

*२) मनाला सावरायचं म्हणजे काय ?* मनाला फोकस करता आलं पाहिजे . उदा . अभ्यास करताना विशिष्ट कालावधीत अभ्यासाचा विशिष्ट टप्पा ठरवून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा .

*३) मनाला सजवायचं कसं ?* तर सतत चांगले , आनंदी , सुखाचे , यशाचे विचार मनात घोळवत ठेवायचे . आतापर्यंत माझं चांगलं झालं आणि यापुढेही चांगलंच होणार अशा सकारात्मक विचारांनी मनाला सजवायचं .

*४) मनाला जोडायचं ! कुणाशी अन् कसं ?* मनाला जोडायचं सर्वांशी ! माळेतले मोती जसे एका समान धाग्यात गुंफलेले असतात तसे विश्वातले आपण सर्व जण एका मनरुपी धाग्याने नकळतपणे जोडलेलो आहोत .

या सर्वांबद्दल सतत शुभ विचार , शुभ चिंतन करुन त्यांच्याशी आपल्याला जोडायचंय . त्यासाठी *' विश्वप्रार्थनारुपी '* सुवर्ण विचार *' सदगुरु श्री वामनराव पै '* ह्यांनी दिलेला आहे . हा सुवर्ण विचार सतत मनात घोळवत ठेवला की विश्वातील प्रत्येकाशी आपले नाते दृढ होत जाते .

असे हे मनरुपी सामर्थ्यशाली उपकरण जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला मिळालेलं आहे . ज्ञानाच्या अधिष्ठानावर जेव्हा आपण या मनाशी संबंध जोडतो तेव्हाच आपलं जीवनशिल्प सुंदर घडतं !

बुध्दीच्या जोरावर माणूस चंद्रावर पोहोचला . अनेक शोध त्याने लावले . माणसाकडे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे ते बुध्दीमुळेच ! अशी ही बुध्दी परमेश्वराने दिली आणि ती वापरण्याचं स्वातंत्र्य देखील दिलं !

त्या बुध्दीचा चांगला वापर करुन जीवनशिल्पाला चांगला आकार द्यायचा आणि त्यातूनच ती अधिकाधिक तीक्ष्ण अन् सूक्ष्म करायची की तिचा वापर करायचाच नाही हे कुणी ठरवायचे ?

म्हणूनच जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते ,               *' तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !'*

              *(जीवनविद्या मिशन)*

��������������������������������

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा