श्राद्ध का करावे?
श्राद्ध का करावे? न केल्यास काय होते?
मानव योनी खेरीज दुसऱ्या योनीत पितर गेले असले तर त्यांना आपले अन्न कसे उपयोगी होईल? .
प्रश्न छान आहे:- फक्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सर्व प्रकरण अदृश्य असल्याने ते पटवून देणे कठीण आहे. हे सर्व अतींद्रिय असल्याने शास्रवचना वरून बुद्धी ग्राह्य आहे . बुद्धीग्राह्यमातींद्रीयम " विमुढानानुपश्यंति पश्यंति ज्ञानचक्षुष:।। असे गीतेत म्हणले आहे. सूर्यलोक , चांद्रलोक, पितृलोक , इत्यादी लोक व पुनर्जन्म मानलेच नाही तर हा प्रश्न संभवत नाही. पण पुनर्जन्म हा तर हिंदू धर्माचा सिद्धांत आहे. शिवाय आता पुनर्जन्माचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. तेव्हा कर्मतत्व व पुनर्जन्म मानणे भागच आहे. कर्मानेच पुनः पुनः जन्म मिळतो . जन्माला आल्यावर कर्म करावेच लागते. मृत्यूनंतर त्याने केलेले कर्मच फक्त त्याच्या बरोबर जाते. कर्मानुगो गच्छति जीवएक:।। म्हणून कर्म हे मानवी जीवनाचे उपादान कारण आहे. असे शास्त्र सांगते. *यत् श्रद्धया क्रियते तत् श्राध्दम्।। * शास्त्राने पितरांचे श्राद्ध श्रद्धेने करावे असे सांगितले आहे. कोणत्याही धार्मिक कृत्यात श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे. मरणोत्तर जीवन हा विषय गहन व अवघड असला तरी तो समजून घेने आवश्यक आहे. मरणोत्तर हि जीवन असते. ते दिव्य शरीरधारी व वायुरूप असते. तथापि ते मानवी शरीरातही दर्शन देऊ शकते. दशरथाने मरणोत्तर रामाला दर्शन दिले होते. कौरव पांडव युद्धात मरण पावलेल्या योध्यांना व्यासांनी अल्पकाळ पुनः इहलोकी बोलावून आणले होते, असे महाभारतात वर्णन आहे. श्रीमत् शंकराचार्यांना व्यासांनी दर्शन दिले होते. तात्पर्य मनुष्य मेला कि सारे संपले असे नाही. मरणोत्तर जीवन असे एक पुस्तक प्रसिद्ध आहे" . पाश्चात्य लेखक फ्लामेरिओ यांचे 'डेथ अँड हिस्ट्रीज आफ्टर डेथ " हे व या विषयी अनेक इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत. गरुडपुराणांत तर याचे विस्तृत वर्णन आहे. म्हणून 10 दिवसाच्या अशोचात हे ऐकण्याची आपल्याकडे प्रथा आहे. .
मृत पितर हे पितृ योनीतच आहेत का त्यांना अन्य जन्म मिळाला आहे, हे समजण्यास मार्ग नाही. पितृयोनीतून ते मुक्त होऊन त्यांना सद्गती प्राप्त होण्या करीता पुत्राने यावज्जीव त्यांचे श्राद्ध करणे हे त्याचे कर्तव्य आहे. श्राद्ध कर्मातील ब्राम्हण भोजन द्वारा व पिण्डदान द्वारा मृत पितरांना अन्न मिळते. हे महाभारतातील कथेवरून सिद्ध आहे. पितामह भीष्म आपल्या पिता शंतनुचे श्राद्ध गंगेकाठी करत होते. आता पिण्डदान करणार एवढ्यात शंतनुचा हात गंगेतून वर आला. मला अतिशय भूक लागली आहे .तेव्हा दर्भावर पिण्डदान न करता माझ्या हातावर पिण्ड दे.म्हणजे मी ते लगेच खाईन . अशी आकाशवाणी भीष्माला ऐकू आली असे वर्णन महाभारतात आहे.
*श्राद्धतील तीन महत्वाची कर्मे* ,
श्राद्धामध्ये अग्नौकरण, ब्राम्हण भोजन , पिण्डदान हे तीन महत्वाची ३ कर्मे आहेत.व या तिन्ही कर्माने पितरांना अन्न मिळून ते तृप्त होतात. हे सिद्ध आहे. तृप्त झालेले पितर आयुष्य -प्रजा-धन-विद्या- स्वर्ग-मोक्ष- पुत्र -पौत्र इत्यादी प्राप्त होवोत.कुळाची वृद्धि होवोत असा आशीर्वाद देतात. मुलानी श्राद्ध न केल्यास त्या दिवशी पितर वायू रूपाने घरी येतात ,ते भुकेले असल्याने मुलाचे रक्त पिऊन जातात ,असे शास्त्र सांगते. ज्या घरी श्राद्ध होत नाही त्या घरी कितीही ऐश्वर्य असले तरी शांती व समाधान नसते. पुत्रप्राप्ती होत नाही असे दिसते. अशा लोकांनी पितरांचे श्राद्ध करावयास सुरु केल्यास शांती व समाधान लाभत व पुत्रप्राप्ती होते असे प्रत्यक्ष उदाहरणे आहेत.
मानव योनी खेरीज पशु पक्षी इत्यादी योनीत (त्यांच्या कर्मानुसार) त्यांना जन्म मिळाला असेल तर, त्यांना आपले अन्न (भात ) कसे उपयोगी पडेल ? याचे उत्तर अमेरिका फ्रांस इत्यादी देशांचे चलन (नाणे) वेगवेगळे आहे , तेथील आपल्या नातेवाईकांस पैसे पाठविताना आपण येथील बँकेत भारतीयच चलन देतो ,पण त्या देशाला ते पैसे तेथील चलनात रूपांतरित करून दिले जाते.त्याच प्रमाणे या योनीत त्यांचं जे भक्ष असेल त्यात रूपांतर होऊन तेथील अन्न त्यांना मिळ्तेव ते तृप्त होतात. श्राद्ध हे पितरांच्या तृप्ती करत केले जाते . श्राद्ध कर्मातील काही विशिष्ट विधी केल्याने पितर सांगितल्या पैकी कोणत्याही लोकात असले तरी त्यांची तृप्ती होते हे सांगणार वचन सोबत देत आहे अग्नौकरण देवस्था: स्वर्गस्था विप्रभोजनै:। यमस्था पिंडदानेन नरके विकिरेणतु।। उच्छिष्टेन पैशाच्चाद्या: असुरान् भुरीभोजनात् । दक्षिणेन मनुष्याद्या श्राद्धे सप्तविधीयते ।।
अर्थ:-अग्नौ करण केल्याने देवलोकीचे आपले पितर तृप्त होतात. ब्राम्हण भोजनांने स्वर्गात गेलेले पितर तृप्त होतात , पिण्डदान केल्याने यमलोकात गेलेले पीतर तृप्त होतात, विकिर केल्याने नरकातील पितर तृप्त होतात, उच्छिष्ट भाग दिल्याने पिशाच योनीतील पितर तृप्त होतात, मोठया प्रमाणात अन्नदान केल्याने असुर लोकात गेलेले पितर त्रुप्त होतात. दक्षिणा दिल्याने परत मनुष्य योनीत आलेले पितर तृप्त होतात, अश्या 7 प्रकारच्या श्राधीय कर्माने सर्व पितर तृप्त होतात
*।।इति धर्मशास्त्र निर्णय:।। जय श्रीराम ।।*
शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६
श्राद्ध का करावे?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा