.-अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान | एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान ||धृ||दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया | बालपणी गेलासी तू सूर्याला धराया |
हादरली ही धरणी, थरथरले आसमान
||१||लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण | द्रोणागिरी साठी राया केले तू उड्डाण | तळ हातावर आला घेऊनी पंचप्राण
||२||सीतामाई शोधा साठी गाठलीgस लंका | तिथे राम नामाचा तू वाजविला डंका | दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण
||३||हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला | पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला | उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
||४||आले किती, गेले किती, संपले भरारा | तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा | धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण |
|५||धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा | तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा | घे बोलावूनआता कंठाशी आले प्राण ||६||..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा