शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

मनरुपी मित्र (बालसंस्कार)*

*मनरुपी मित्र (बालसंस्कार)*

मित्रांनो , आपल्या सामर्थ्यशाली मनाबरोबर आपल्याला मैत्री करायची आहे . हा मनरुपी मित्र आपल्या बरोबर २४ तास असतो .

आपण त्याला जे - जे सांगू ते - ते तो आपल्या जीवनात साकार करतो . तो आपल्या सुख - दुःखांना संबंधित असतो .किंबहुना आपल्या सुख - दुःखांना तोच कारणीभूत असतो .

या मनरुपी मित्राच्या साथीने आपलं जीवनशिल्प जर सुंदर , सुबक करायचं असेल तर आपल्याला काय बरं केलं पाहिजे ?

त्यासाठी मनाला आवरायला हवं , मनाला सावरायला हवं , मनाला सजवायला हवं , अन मनाला जोडायला हवं ! म्हणजे काय ? पाहू या !

*१) मनाला आवरायचं केव्हा ?* तुम्ही मुलं कधी - कधी नको त्या गोष्टी प्रमाणाबाहेर करता . तिथे मनाला आवरा . उदा . काॕम्प्युटर गेम , मोबाईलवरील गेम , टी . व्ही . पाहणं इ .

*२) मनाला सावरायचं म्हणजे काय ?* मनाला फोकस करता आलं पाहिजे . उदा . अभ्यास करताना विशिष्ट कालावधीत अभ्यासाचा विशिष्ट टप्पा ठरवून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा .

*३) मनाला सजवायचं कसं ?* तर सतत चांगले , आनंदी , सुखाचे , यशाचे विचार मनात घोळवत ठेवायचे . आतापर्यंत माझं चांगलं झालं आणि यापुढेही चांगलंच होणार अशा सकारात्मक विचारांनी मनाला सजवायचं .

*४) मनाला जोडायचं ! कुणाशी अन् कसं ?* मनाला जोडायचं सर्वांशी ! माळेतले मोती जसे एका समान धाग्यात गुंफलेले असतात तसे विश्वातले आपण सर्व जण एका मनरुपी धाग्याने नकळतपणे जोडलेलो आहोत .

या सर्वांबद्दल सतत शुभ विचार , शुभ चिंतन करुन त्यांच्याशी आपल्याला जोडायचंय . त्यासाठी *' विश्वप्रार्थनारुपी '* सुवर्ण विचार *' सदगुरु श्री वामनराव पै '* ह्यांनी दिलेला आहे . हा सुवर्ण विचार सतत मनात घोळवत ठेवला की विश्वातील प्रत्येकाशी आपले नाते दृढ होत जाते .

असे हे मनरुपी सामर्थ्यशाली उपकरण जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला मिळालेलं आहे . ज्ञानाच्या अधिष्ठानावर जेव्हा आपण या मनाशी संबंध जोडतो तेव्हाच आपलं जीवनशिल्प सुंदर घडतं !

बुध्दीच्या जोरावर माणूस चंद्रावर पोहोचला . अनेक शोध त्याने लावले . माणसाकडे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे ते बुध्दीमुळेच ! अशी ही बुध्दी परमेश्वराने दिली आणि ती वापरण्याचं स्वातंत्र्य देखील दिलं !

त्या बुध्दीचा चांगला वापर करुन जीवनशिल्पाला चांगला आकार द्यायचा आणि त्यातूनच ती अधिकाधिक तीक्ष्ण अन् सूक्ष्म करायची की तिचा वापर करायचाच नाही हे कुणी ठरवायचे ?

म्हणूनच जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते ,               *' तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !'*

              *(जीवनविद्या मिशन)*

��������������������������������

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

देवी नवरात्र

देवीचे शारदीय नवरात्र जवळ आले आहे त्याबद्दल आपण धर्मशास्त्रीय माहिती आज पाहुयात                                              
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास *शारदीय नवरात्र* असे म्हणतात.                               
  नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पळाला गेला पाहिजे .  आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे , त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.   अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम रावण युद्धातही  रावणाच्या वधा साठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते.        
 
*नवरात्र व्रताचे प्रकार:-*  
१)प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र
२) प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत
३) पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत 
४) सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत         .                                                          
 
*नवरात्रीचे अंगे:-*
 नवरात्रीचे प्रमुख ४ अंगे आहेत.
*१) देवता स्थापन
२) माला बंधन
३) नंदादीप (अखंड दीप)
४) कुमारिका पूजन*
    हि आहेत.काही जणांकडे (वेदिका) शेत स्थापना करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून  त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत. नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी .तेलाची जोडवात एक वित लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात. नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाम मंत्राचा १०८/१००८ जप करावा किंवा विष्णूसहस्रनाम वाचावे .                   
 नवरात्रात माला बंधन करताना (माळ बांधताना)त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी .                                       
*कुमारिका पूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे*                       
शक्य असल्यास नवरात्र संपे पर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे.                       
 *स्कंद पुराणात तिच्या वया नुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत.*                                               *२ वर्षाची- कुमारी /
३वर्षाची -त्रिमूर्तीनी /
४ वर्षाची -कल्याणी /
५वर्षाची - रोहिणी /
६ वर्षाची -काली /
७ वर्षाची -चंडिका /
 ८ वर्षाची -शांभवी /
९ वर्षाची - दुर्गा / व
१० वर्षाची - सुभद्रा*  
                       ,   ,                                                
 *कुमारिका पूजनाचे फळ पुढील प्रमाणे:-- 
१ कुमारिका पूजन- ऐश्वर्य प्राप्ती /
२ कुमारिका पूजन-- भोग व मोक्ष प्राप्ती /
३ कुमारिका पूजन -- धर्म व अर्थ प्राप्ती /
४ कुमारिका पूजन-- राज्यपद प्राप्ती /
५ कुमारिका पूजन-- विद्या प्राप्ती /
६ कुमारिका पूजन--षट् कर्म सिद्धी /
 ७ कुमारिका पूजन---राज्य प्राप्ती /
८ कुमारिका पूजन--संपत्ती /
 ९ कुमारिका पूजन--पृथ्वीचे राज्य मिळते.*
            नवरात्रात सप्तशती  पठणाचे विशेष महत्व आहे . सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नी सामान आहे.मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करिन. सर्व शांतिकर्म - - दुःस्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील  असे देवी माहात्म्य सांगते. राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे. अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते , तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात.
*नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ,ते पुढील प्रमाणे:-*      
 रविवारी -पायस(खीर) /
सोमवारी -गायीचे तूप /
 मंगळवारी -केळी /
बुधवारी -- लोणी /
गुरुवारी --खडीसाखर /
शुक्रवारी -- साखर /
शनिवारी --गायीचे तूप .......      
          नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र वाचन /महालक्ष्मी अष्टक / कनकधारा स्तोत्र /रामरक्षा / देव्यपराध स्तोत्र / श्रीसूक्त /शुलिनीदुर्गा सुमुखी स्तोत्र इत्याद स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे व जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा
.१)सात्विक अन्नाचे सेवन (शक्यतो परांन्न वर्ज्य करावे)
२) ब्रम्हचर्य पालन ३) दाढी व कटिंग करू  नये
४) गादीवर पलंगावर न झोपणे .
*नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो.*     
 *।।इति धर्मशास्त्र निर्णय:।।* 
              *।।जय श्रीराम।।*
                                         
शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखांक १ ते २

प्रश्न : - *आत्मा जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे ,त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय* ???
असे म्हणतात त्यांना खुप वेगवेगळे प्रवास असतात ,त्यामधे आपण सारखे आठवण काढत राहीलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो...
कृपया नक्की काय असते समजावलेत तर बरे होईल ...
 
 || मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
[ *लेखांक १ ला* ]
प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे.
         यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते, शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करतात, आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात . अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ .
अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थ असा आहे की , मेलेल्या वेक्तिला संबोधुन मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे सर्व पहात असतो. तेंव्हा त्या मंत्राचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहीलेला नाहि तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे म्हणतात . आता आम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळुन टाकणार आहोत असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात, जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेवुन प्रेताला अपसव्य म्हणजे डावि प्रदक्षिणा घालतो , यावेळेस एका दगडाने खांद्यावरिल मडक्याला एक भोक पाडतात , अशा तिन प्रदक्षिणा करुन प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छाद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात तेव्वा त्या माठाचा फ sss ट् असा आवाज होवुन तो फुटतो यालाच घटस्फोट असे म्हणतात .( आता नवरा जिवंत किवा बायको असतानाच घटस्फोट घेतला जातो ) या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथुन जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामधे बांधतात याला अश्मा असे म्हणतात . त्या नंतर प्रेताळा जाळले जाते .
   आत्मा हे सगळं पहात असतो , त्याला आपला देह जळताना पाहुन वाईट वाटते , त्याला रडायला येते , ( येथे आशी कुणी शंका घेवु नये की आत्मा रडतो का ? तर आत्मा अजुनही चार कोषामधे बद्ध आहे व यात मनोमय कोष असल्यामुळे वासना , भावना असतात ) प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो , तो आत्माही आपल्या सोबत घरी येतो मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात , दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो.
घरात दक्षिणेकडे कडे तोंड करुन दिवा लावला जातो याला नमस्कार करुन आलेली मंडळी निघुन जातात.घरातिल माणसं अंघोळ करुन पिढलभात खायला मोकळी होतात ........
पुढे काय होते ...?
क्रमश....
पुढील लेखात पाहू
 
 || मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||
 
|| *लेखांक दुसरा* ||
 
कालच्या लेखात आपण पाहीले की, प्रेताला अग्नी देऊन सगळे घरी येतात, अश्मा घराबाहेर ठेवतात , आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघुन जातात व घरातील मंडळी पिठलं भात खावुन दुःख करित बसतात . पुढे------++--
अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर , गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात असा सर्वदूर समज आहे पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे.लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याचि प्रक्रिया आहे ती आपण पुढे पहाणार आहोत.
आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतिक आहे, आत्ता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक , आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात कारण दहा दिवस आत्मा घराबाहेच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो.
त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक , मित्र मैत्रीणी, परिवार भेटायला येतात, घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्ती बद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडले की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पहात असतो , ऐकत असतो.आपल्या बद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो हे सगळं त्याला कळत आसतं त्यामुळे त्याला खुप दुःख होतं व रडायला येतं .
या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थीचं विसर्जन वहात्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातुन कलशासगट करावं .
दहाव्या दिवशी त्या अश्म्याला घेवुन घाटावर जातात तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे म्हणजे दाढी मिशा व डोक्यावरील केस काढावेत , या घाटावर जो विधि केला जातो
तो म्हणजे काय असतो ? या आत्म्याचा प्रवास कसा सुरु होतो व त्याचे पुढे काय होते ते उद्या पाहु ****
क्रमशः -
 
राष्ट्रीय कीर्तनकार
*हभप श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी*

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखांक १ ते ३

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

श्राद्ध का करावे?

श्राद्ध का करावे?            
  
श्राद्ध का करावे? न केल्यास काय होते?
मानव योनी खेरीज दुसऱ्या योनीत पितर गेले असले तर त्यांना आपले अन्न कसे उपयोगी होईल?            .                                                 
प्रश्न छान आहे:- फक्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की  हे सर्व प्रकरण अदृश्य असल्याने ते पटवून देणे कठीण आहे.  हे सर्व अतींद्रिय असल्याने शास्रवचना वरून बुद्धी ग्राह्य आहे .  बुद्धीग्राह्यमातींद्रीयम "  विमुढानानुपश्यंति  पश्यंति ज्ञानचक्षुष:।। असे  गीतेत म्हणले आहे.  सूर्यलोक , चांद्रलोक, पितृलोक , इत्यादी लोक व पुनर्जन्म मानलेच नाही तर हा प्रश्न संभवत नाही.  पण पुनर्जन्म हा तर हिंदू धर्माचा सिद्धांत आहे. शिवाय आता पुनर्जन्माचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. तेव्हा कर्मतत्व व पुनर्जन्म मानणे भागच आहे. कर्मानेच पुनः पुनः जन्म मिळतो . जन्माला आल्यावर कर्म करावेच लागते. मृत्यूनंतर त्याने केलेले कर्मच फक्त त्याच्या बरोबर जाते. कर्मानुगो गच्छति जीवएक:।। म्हणून कर्म हे मानवी जीवनाचे उपादान कारण आहे.       असे शास्त्र सांगते.                                                             *यत् श्रद्धया क्रियते तत् श्राध्दम्।। * शास्त्राने पितरांचे श्राद्ध श्रद्धेने करावे असे  सांगितले आहे.  कोणत्याही धार्मिक कृत्यात श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे.  मरणोत्तर जीवन हा विषय गहन व अवघड असला तरी तो समजून घेने आवश्यक आहे.  मरणोत्तर हि जीवन असते.  ते दिव्य शरीरधारी व वायुरूप असते. तथापि ते मानवी शरीरातही दर्शन देऊ शकते. दशरथाने मरणोत्तर रामाला दर्शन दिले होते.  कौरव पांडव युद्धात मरण पावलेल्या योध्यांना व्यासांनी अल्पकाळ पुनः इहलोकी बोलावून आणले होते, असे महाभारतात वर्णन आहे. श्रीमत् शंकराचार्यांना व्यासांनी दर्शन दिले होते. तात्पर्य मनुष्य मेला कि सारे संपले असे नाही.  मरणोत्तर जीवन असे एक पुस्तक प्रसिद्ध आहे"         .                                                  पाश्चात्य लेखक फ्लामेरिओ यांचे 'डेथ अँड हिस्ट्रीज आफ्टर डेथ " हे व या विषयी अनेक इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत. गरुडपुराणांत तर याचे विस्तृत वर्णन आहे. म्हणून 10 दिवसाच्या अशोचात हे ऐकण्याची आपल्याकडे प्रथा आहे.                                         .                                                
मृत पितर हे पितृ योनीतच आहेत का त्यांना अन्य जन्म मिळाला आहे, हे समजण्यास मार्ग नाही. पितृयोनीतून ते मुक्त होऊन  त्यांना सद्गती प्राप्त होण्या करीता पुत्राने यावज्जीव त्यांचे श्राद्ध करणे हे त्याचे कर्तव्य आहे. श्राद्ध कर्मातील ब्राम्हण भोजन द्वारा व पिण्डदान द्वारा मृत पितरांना अन्न मिळते. हे महाभारतातील कथेवरून सिद्ध आहे. पितामह भीष्म आपल्या पिता शंतनुचे श्राद्ध गंगेकाठी करत होते. आता पिण्डदान करणार एवढ्यात शंतनुचा हात गंगेतून वर  आला. मला अतिशय भूक लागली आहे  .तेव्हा दर्भावर पिण्डदान न करता माझ्या हातावर पिण्ड दे.म्हणजे मी ते लगेच खाईन . अशी आकाशवाणी भीष्माला ऐकू आली असे वर्णन महाभारतात आहे.                     
*श्राद्धतील तीन महत्वाची कर्मे*     ,
  श्राद्धामध्ये अग्नौकरण, ब्राम्हण भोजन , पिण्डदान हे तीन महत्वाची ३ कर्मे आहेत.व या तिन्ही कर्माने पितरांना अन्न मिळून ते तृप्त होतात. हे सिद्ध आहे. तृप्त झालेले पितर आयुष्य -प्रजा-धन-विद्या- स्वर्ग-मोक्ष- पुत्र -पौत्र इत्यादी प्राप्त होवोत.कुळाची वृद्धि होवोत असा आशीर्वाद देतात. मुलानी श्राद्ध न केल्यास त्या दिवशी पितर वायू रूपाने घरी येतात ,ते भुकेले असल्याने मुलाचे रक्त पिऊन जातात ,असे शास्त्र सांगते. ज्या घरी श्राद्ध होत नाही त्या घरी कितीही ऐश्वर्य असले तरी शांती व समाधान नसते. पुत्रप्राप्ती होत नाही असे दिसते. अशा लोकांनी पितरांचे श्राद्ध करावयास सुरु केल्यास शांती व समाधान लाभत व पुत्रप्राप्ती होते असे प्रत्यक्ष उदाहरणे आहेत.               
  मानव योनी खेरीज पशु पक्षी इत्यादी योनीत (त्यांच्या कर्मानुसार) त्यांना जन्म मिळाला असेल तर, त्यांना आपले अन्न (भात ) कसे उपयोगी पडेल ? याचे उत्तर अमेरिका फ्रांस इत्यादी देशांचे चलन (नाणे) वेगवेगळे आहे , तेथील आपल्या नातेवाईकांस पैसे पाठविताना आपण येथील बँकेत भारतीयच चलन देतो ,पण त्या देशाला ते पैसे तेथील चलनात रूपांतरित करून दिले जाते.त्याच प्रमाणे या योनीत त्यांचं जे भक्ष असेल त्यात रूपांतर होऊन तेथील अन्न त्यांना मिळ्तेव ते तृप्त होतात. श्राद्ध हे पितरांच्या तृप्ती करत केले जाते . श्राद्ध कर्मातील काही विशिष्ट विधी केल्याने पितर  सांगितल्या पैकी कोणत्याही लोकात असले तरी त्यांची तृप्ती होते हे सांगणार वचन सोबत देत आहे   अग्नौकरण देवस्था: स्वर्गस्था विप्रभोजनै:।  यमस्था  पिंडदानेन  नरके विकिरेणतु।। उच्छिष्टेन पैशाच्चाद्या: असुरान्  भुरीभोजनात् । दक्षिणेन मनुष्याद्या  श्राद्धे सप्तविधीयते ।।                  
अर्थ:-अग्नौ करण केल्याने देवलोकीचे आपले पितर तृप्त होतात. ब्राम्हण भोजनांने स्वर्गात गेलेले पितर तृप्त होतात , पिण्डदान केल्याने यमलोकात गेलेले पीतर तृप्त होतात, विकिर केल्याने नरकातील पितर तृप्त होतात, उच्छिष्ट भाग दिल्याने पिशाच योनीतील पितर तृप्त होतात, मोठया प्रमाणात अन्नदान केल्याने असुर लोकात गेलेले पितर त्रुप्त होतात. दक्षिणा दिल्याने परत मनुष्य योनीत आलेले पितर तृप्त होतात, अश्या 7 प्रकारच्या श्राधीय कर्माने सर्व पितर तृप्त होतात
*।।इति धर्मशास्त्र निर्णय:।। जय श्रीराम   ।।*

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

तात्यासो. धोंडूपंत वल्लभ गुरव यांना चतुर्थ पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली

 भावपूर्ण श्रद्धांजली

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः .
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि :
या शरीराला शस्त्र कपू शकत नाही.  कारण हे प्राकृत शस्त्र तेथपर्यंत
पोहचूच शकत नाही. जेवढी शस्त्रे  आहेत ती सर्व पृथ्वी- तत्वापासून
उत्पन्न झालेली असतात. हे पृथ्वी तत्व या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा
विकार निर्माण करू शकत नाही. एवढेच नव्हे  तर  हे पृथ्वी तत्व
शरीरापर्यंत पोहचूच शकत नाही तर मग विदृती करण्याची गोष्ट तर दूर राहिली.

नैनं दहति पावकः
अग्नी या शरीराला जाळू शकत नाही कारण अग्नी तेथपर्यंत पोहचूच शकत नाही तर
मग त्याचेकडून जाळणे कसे संभावते? तर्पार्य अग्नी- तत्व ह्या शरीरामध्ये
कधीहि कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही.

न चैनं क्लेदयन्त्यापो
पाणी याला भिजवू शकत नाही कारण पाणी तेथपर्यंत पोहचूच शकत नाही. तर्पार्य
जल-तत्व ह्या शरीरामध्ये कधीहि कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत
नाही.

न शोषयति मारुतः
वारा ह्याला वाळवू शकत नाही कारण अर्थात वारा या शरीराला वाळविण्यास
असमर्थ आहे. कारण वारा तेथपर्यंत पोहचूच शकत नाही. तर्पार्य वायू-तत्व
ह्या शरीरामध्ये कधीहि कसल्याच प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाही.

पृथ्वी, जल, तेज. वायू, आकाश - हे पंचमहाभूते म्हणविले जातात. भगवंतानी
यापैकी चारच महाभूतान्विषयी म्हटले आहे की ; हे पृथ्वी, जल, तेज, वायू,
या शरीरात कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाहीत परंतु
पाचव्या महाभूत आकाशाविषयी काहीही चर्चा केलेली नाही. याचे कारण असे आहे
की, आकाशात कोणतीच क्रिया करण्याची शक्ती नाही. क्रिया (विकृती) करण्याची
शक्ती तर या चार महाभूतांमध्ये आहे आकाश केवळ या सर्वाना अवकाश (जागा)
देते

येथे युद्धाचा प्रसंग आहे "हे सर्व कुटुंब मृत्युमुखी पडतील" या कल्पनेने
अर्जुन शोक करीत आहे म्हणून भगवान म्हणतात की, हे कसे मरतील? वर
सांगितल्याप्रमाणे शस्त्राने शरीर कापले गेले तरी शरिरी कापला जात नाही,
अग्नी द्वारा शरीर जाळून गेले तरी शरिरी जळत नाही. वरुणास्राद्वारा शरीर
भिजविले गेले तरीही शरीरी ओला होत नाही आणि वायव्यास्राद्वारा शरीर
वाळविले गेले तरीही शरिरी वाळला जात नाही. तर्पार्य अस्र-शास्राद्वारा
शरीर मृत्युमुखी पडते तरीही शरीर मरत नाही तर जसाच्या तसा निर्विकार
राहतो. म्हणून याविषयी शोक करणे हे केवळ तुझे अज्ञान आहे.

तात्यासो. धोंडूपंत वल्लभ गुरव यांना चतुर्थ पुण्यतिथी निमित्त सोनवणे परिवार विखरण (देवाचे) कडून विनम्र अभिवादन !!!

भावपूर्ण श्रद्धांजली

अँड. सुरेंद्र राजाराम सोनवणे

नाशिक