मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

शहनाई रत्न विजय गुरव

 -   भामरे आण्णा

सर्व बंघू भगिनींना सांगतांना मला आनंद वाटतो की मला जरी कला अवगत नसली तरी माझ्या सासरी संगित. कलेत सर्वच जण मशहूर आहेत. कै.जानकिरामजी गुरव ह्याचे संगित नाटकांच्या जमान्यात हार्मोनियम वादक  म्रृदुंगाचार्य म्हणून ख्याती होती. त्यांची दोन मुले  कै .बाबुराव व कै. पुंडलिकराव शहनाईचे वस्ताद म्हणून प्रसिद्घ होते   जेष्ठ सुपूत्र कै.बाबुराव ऊर्फ दामोधर हे शहनाई बरोबर तबला पटू पण होते. नगरचे प्रसिद्ध किर्तनकार नाथबुवांचे  बरोबर बरेच दौरे ईतरत्र त्यांचे झालेत. दिनानाथ मंगेशकर व हिराबाई बडोदेकर यांची नाटकात व गायनात त्यांनी साथ संगत केली असून तोच वारसा त्यांचे सुपूत्र विजय गुरव यांच्यात ऊतरलाय.
  विजय गुरव हे शहनाई चे वस्ताद आहेत. शहनाईच्या आवाजाची मधुरता  फुंक वर अवलंबून असते .ते कसब विजयजीं जवळ आहे. कर्णमधुरता सर्वांनाच जमेल असे नाही. संगितातिल राग केव्हा व कसा शहनाईच्या मधुर स्वरांनी पुलकित करावे याची जाण विजयजींना आहे.  नुसते संगितच नाही तर श्रवण कर्त्याला काय हवे तेही बघावे लागते. मग फिल्म संगित असो ; नाट्य संगित असो.वा पोवाडा लावण्या; भक्ती संगीत या सोबत पोवाडा शहनाईच्या माध्यमातून सादर करणे सहज साध्य नाही.पण---   हे सर्व विजय गुरवांनी साध्य केले आहे. शहनाई सोबत संभळ व नगारा वाजवणे चे कसबही त्यांनी अवगत केले आहे.  ताल व स्वरांचा अनोखा संगमच त्यांच्या अंगी असून त्यांना नुकताच बहुऊद्देशिय कला विश्व परिवार या संस्धेने त्यांना संस्थेचेअध्यक्ष श्री कवीराज राजेंन्द्र जैन यांचे सह धुळे महानगरच्या महापौर सौ ज़यश्री ताई अहिरराव यांचे शुभ हस्ते संगित शहनाई बद्दल शहनाई रत्न हा पुरस्कार देवून सन्मानीत केले. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या विजय गुरवांचा भामरे आण्णा परिवाराने घरी सत्कार करून अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा