रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

चिंचवड येथे 11ऑक्टोबर रोजी बैठक

- प्रताप गुरव

नमस्कार,
सवॆ समाज बंधु भगिनींनादिनांक 11ऑक्टोबर रोजी चिंचवड येथे होणा-या समाजाच्या संघर्ष समन्वय समितीचे बैठकीबाबत विनम्र असे निवेदन सर्व निमंत्रकाच्या वतीने करतो की,
 
(1) महाराष्ट्रातील अनेक मान्यवरानी केलेल्या विनंती नुसार गटतट बाजूला ठेवून समाजाच्या प्रलंबित मागण्या बाबत शासनदरबारी एकच एकमुखी निवेदन असावे हा प्रामाणिक हेतु डोळ्यासमोर ठेवून एक प्रयत्न आहे.
(2) समाजातील काही जेष्ठ लोकांशी या बाबत चर्चा केली आहे.
(3)अनेक कायॆक्रमातून सर्वसामान्य समाज बाधंवांचा एकत्रित लढा द्यावा हाच सूर ऐकायला येत होता
(4) भटके  विमुक्त, नंदीवाले कोल्हाटी, माकडवाले, पाथरवट वडार.महादेव कोळी असे अनेक जागी विखुरलेले ; शैक्षणिक मागासलेले कोणतेही संघटन नसताना शासन दरबारी लढा देत आहे त्यांच्या समाजात कलेक्टर , आयएएस आयपीएस फिल्मनिर्माते क्लासवनऑफीसर, उद्दोजक होउ शकतात ते होण्यासाठी काय काय भोग भोगावे लागले हे त्यांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर लक्षात येते ते वाचतांना डोळ्यातील अश्रु आपोआप येउ लागतात.
(5) आपल्या समाजाच्यीशैक्षणिक परिस्थिती त्यांच्या पेक्षा निश्चित चागंली आहे सामाजिक प्रतिष्ठा ब-यापैकी आहे मग एवढे असूनही आजची आपली खरी पोझीशन काय आहे याचा आपला समाज शोध आणि बोध घेणार आहे की नाही? 👈
(6 ) 11ऑक्टोबर च्या बैठकीचा हेतु तो आहे.
  • देवस्थान इनामजमिन वर्ग 3चे बाबत
  • देवस्थान टृस्ट अधिकाराबाबत
  • देवस्थान पूजेचे वंशपरंपरेने असलेल्या अधिकाराबाबत
  • देवस्थान दानपेटीच्या सदंर्भातील प्रश्न
  • या सवॆ वरिल प्रश्नाबाबत ज्या ज्या समाज बाधंवानी वैयक्तिक लढा देउन जिंकलेल्या केसेस अनुभव कथन आणि लेखी कागदपत्रांचे सकंलन करून त्याआधारे एक सर्वसमावेशक निवेदन तयार करावयाचे आहे
  • बैठकीत त्या साठी एक कोअर कमिटी गठीत करण्यासाठी चर्चा होईल
  • बैठक वेळेतच चालू होईल
  • प्रथम आराध्य दैवत भगवान श्री शंकर आणि संत काशीबा गुरव (महाराज)यांच्या प्रतिमेचे पूजन होईल
  • समाजातील व इतर मान्यवर व्यक्तींच्या निधनाबद्दल शोक व मौन पाळून श्रध्दांजली
  • प्रवेश द्वारावर आलेल्या सवॆ समाज बाधंवाचे" पिपंरी-चिंचवड गुरव समाज संस्थेचे वतीने गुलाब पुष्प देउन स्वागत केले जाईल
  • स्वागत कक्षात नांव नोदंणी केली जाईल
  • कायॆक्रमात कोणाचाही सत्कार सभांरभ असणार नाही
  • कायॆक्रमात विचार माडंण्यासाठी संधी मिळालेल्या समाज बाधंवानी खालील गोष्टी कटाक्षाने पाळावयाच्या आहेत
(1) सभेचे अध्यक्ष व उपस्थित समाज बाधंव फक्त एवढा उल्लेख करून मत मांडण्यास सुरुवात करावी
(2) आपल्या विषयावर मत व्यक्त करावे
(3) मत व्यक्त करताना कोणाचाही नामोउल्लेख करू नये
(4) कोणावरही टीका टिपण्णी करू नये अथवा कोणाचे कौतुक देखील करू नये
(5) कोणाचे मन दूखावेल असे व्यक्तव्य  करू नये
(6) एकाच विषयावर चर्चा परत परत करणे टाळावे
(7) माहितगार आणि अभ्यासु समाज बाधंवाना विचार माडंण्यासाठी प्रथम संधी दिली जाईल.
(8) विचार व्यक्त करण्याची संधी देण्याचा अधिकार् सभाअध्यक्षाला राहील
(9) वेळेचे भान ठेवून कोणावरही अन्याय होणार नाही हे पाहीले जाईल
(10) सभेचे नियम काटेकोरपणे पाळावेत

  • आलेल्या समाज बाधंवाना नावाचा बॅच-पेन- लिहिण्यासाठी कागद फोल्डर दिले जाणार आहे
  • अभिप्राय देण्यासाठी वेगळा फाॅर्म दिला जाणार आहे
  • चहा नाष्टा जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे
  • कायॆक्रमास नाममात्र प्रवेश फी असणार आहे
  • त्याची रितसर पावती दिली जाईल
कायॆक्रम पाच वाजता संपेल
विनंती सर्वानी सहकायॆ करावे
 
काही समाज बांधवाची नावे नजरचुकीने यादीत देण्याची राहून गेली आहेत तरी हेच न रागावता निमंत्रण समजून सहकायॆ करावे ही नम्र विनंती

आपला नम्र
प्रताप गुरव
निमंत्रक सघंषॆ समन्वय समिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा