रविवार, १३ मार्च, २०२२

प्रथम पुण्यस्मरण पुष्पाताई

नमस्कार आज मी आपणास माझ्या जीवनाला कलाटणी देण्याचे व आधार देऊन स्वालंबन जीवन जगण्यासाठी सक्षम करणाऱ्या एक आदर्शवत  महिलेची यशोगाथा शब्दांकन करण्याचा प्रयत्न करणार आहे नात्याला व मैत्री ला वयाचे बंधन नसते हे मला पुष्पा ताईंच्या स्नेहा तून जाणवले हे ऐकल्यानंतर स्वाभाविकपणे प्रत्येकाला या मूर्ती विषयी जाणून घेण्याची उत्सुकता झालीच असेल क्षणाची उसंत न घेता ताईंचा जीवन प्रवास कथित करते ताई आमच्या घराण्याला प्राप्त झालेलं दैवी रूपच होय जीवनात प्रत्येकानं दुसऱ्यांच्या जीवनात आनंद देण्यातच आपले सर्वस्व अर्पण केले पाहिजे यासाठी सदोदित कार्यान्वित राहिल्यात जीवन जगत असताना अनेक भूमिका बजावल्या उत्कृष्ट अर्धांगिनी माता सखी भगिनी कन्या विविध नात्यांच्या  भूमिका निभावल्या समाजाचे ऋण म्हणून उत्कृष्ट समाजसेविका वादातून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत यासाठी तंटामुक्ती तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा देखील होतात महिला स्वावलंबी बना व्यात यासाठी पतपेढीच्या संचालक म्हणून कार्यरत बालक ही देवाघरची फुले असतात अंगणवाडी सेविका म्हणून मुलांमध्ये रमान झाल्यात माझ्या जीवनात 1992 93 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती आयुष्यभर विसरणार नाही थोडक्यात एक उत्कृष्ट समाजसेविका कुटुंबवत्सल सर्वांसाठी महान विभूती यास प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन
श्रीमती सखुबाई गुरव, पवार 
पिंपळनेर,

ताईच्या आठवणी. प्रथम पुण्यस्मरण

ताईच्या आठवणी.
😭.. माझे आयुष्यातील सर्वात काळा दिवस 13..मार्च... काय काळ घेऊन आला होता ताईंची... ताईची. तब्येत ठीक नाही होती.. मी.. भाचा. त्याचे मित्र असे डॉक्टर कडे घेऊन जात असताना पाच. मिनिटे अंतर. दवाखाना होता ताई.. अभिजित.. त्याचे मित्र मी तेव्हाच ताईंनी दादा असा आवाज दिला अणि😭सर्व काही सुख एक मिनिटात हिरावून गेले.
ताई जरी बहीण होती पण माझी आई.. बाप.. असे भूमिका ती निभावून सर्व काही ठीक होत.. मुलगा.. आयटी इंजिनिअरिंग पास झाला खुप. जिद्दीने त्याला इंजिनिअर.. केल सर्व मजेत असताना.. ताई गेल्या.. ताई.
सारखी बहीण भेटणे म्हणजे खूपच नशीब लगत पण 😭. लोकांचे धुणी भांडी करून मी अणि लहान तीन बहिणी.. आई बाबा.. सर्वांना 1972..साली खूप दुष्काळ. होता.. तेव्हा धान्य मिळत नव्हते. ताई धुणीभांडी करून पाच घराची पाच भाकरी आणून सर्वांना खायला आणायची. ताईची जेवढी स्तुती करेन तेवढी कमीच आहे. असी माझी बहिण देवाने हिरावून घेतली
.😭ताईने उपकाराची फेड करूच दिली नाही...
खुप दुःख होत... ताई गेले पण लहान बहिण अतिदक्षता विभागात दाखल.. दोन दिवस नंतर जेव्हा विचारले की ताई कशी आहे आम्ही सांगायचे की ठीक आहे.. डोळ्यातून अश्रू सुद्धा. थांबायचे नाही पण देव आमची परीक्षा घेत होता. आम्ही सर्व अश्रू गिळून.. हसत उषाताई जवळ रहायचो.. असा काळा दिवस.. नको. दुःखात.. सुधा.. दुःख.. दिसू दिल नाही.... ताई तुमचे उपकार कसे फेडू 😭😭😭सांगा


बहीण असावी अशी तिचे.. कर्तुत्व..कसे. फेडू 😭😭😭😭😭

नरहरी हिरामण गुरव
निमडाळे

*🌺 प्रथम पुण्यस्मरण 🌺*आई... पुष्पाताई भागवत गुरव 2

*🌺 प्रथम पुण्यस्मरण 🌺*
आई...
१ वर्ष झाला आई तुम्हाला जाऊन...कोणी तरी खरं सांगितलं आहे *आयुष्य काय आहे हे तेव्हाच कळते जेव्हा आयुष्यात आईच्या मायेची आणि बापाच्या छायेची कमी भासते 😞* आई , जग कळायला लागल्यापासून तुम्हीच माझी आई आणि तुम्हीच माझे बाबा झालेत. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली. पण आई एक वर्षांपूर्वी अचानक आयुष्यात असं वादळ आलं की माझे सर्वस्व म्हणजेच तुम्हाला माझ्या पासून हिरावून नेलं. आई तुम्ही मला आयुष्याच्या अश्या अर्धवट वाटेवर सोडून जाणार अस कधीच वाटलं नव्हत, तुमच्या आशीर्वादाची तुमच्या मार्गदर्शनाची खूप जास्त आताच गरज होती आणि तेव्हाच तुम्ही आमची साथ सोडली. आई तुमच्याविना आयुष्य जगणं किती कठीण आहे , जबाबदाऱ्या घेऊन जगणं किती कठीण असत ह्या सर्व गोष्टी मला समजल्या. आई तुमची उणीव आयुष्यभर भरून निघणार नाही पण आई तुमच्या शिकवणी घेऊन तुमचे आशीर्वाद घेऊन आयुष्यात तुमच्या सर्व स्वप्नांना पूर्ण करू शकेल एवढेच मागणं तुमच्याकडे मागतो.
*विनम्र अभिवादन आईसाहेब 😞*
*भावपूर्ण श्रद्धांजली 💔*
           - शोकाकुल -
*श्रीमती. उषा भागवत गुरव*
*चि. अभिजित भागवत गुरव*
समस्त चव्हाण(गुरव)परिवार,धुळे 🙏


प्रथम पुण्यस्मरण - पुष्पाताई भागवत गुरव

*ताई.....💔*
आज पूर्ण १ वर्ष झाले ताई , १ वर्ष ताई , आयुष्याच्या वाटेवर मला तुम्ही एकटं सोडून गेलात...आयुष्याची सुरवात झाली ती तुमच्या सोबतच लहानपणा पासून तुम्ही आम्हा सर्व भाऊ-बहिणींना एका आई प्रमाणे सांभाळले , स्वतः उपाशी पोटी झोपून आम्हा भाऊ-बहिणीच्या पोटाची खळगी भरायचे. तेव्हा पासून माझ्या आयुष्याला तुमच्या आधाराची साथ भेटली. नंतर ताई, आपल्या छोट्याश्या परिवाराला सुरवात झाली आणि थोडे आनंदाचे क्षण येताच पुन्हा दुःख आपल्या दारी आलं पण तेव्हा एका खंबीर आधारप्रमाणे तुम्ही आपल्या घराची धुरा सांभाळली.
कोणा पुरुषाला सुद्धा लाजवेल असे कर्तृत्व आणि नेतृत्व तुम्ही केले, घर सांभाळत असताना आपल्या मुलावर हवे ते संस्कार केले घरच्या परिस्थितिची जाणीव करून दिली.  आणि पुन्हा एक वेळा आयुष्याच्या गोड क्षणाला आणि आनंदाला सुरवात झाली , आपले घर स्वर्गा सारखे झाले होते आणि तेव्हा परत काळाने आपल्यावर आपल्या आनंदावर घाला घातला.  ताई, काही न कळू देता , काही न समजू देता आपले होत्याचे नव्होते झाले...ताई तुम्हाला ह्या दुर्दैवी नशिबाने आमच्या पासून हिरावून नेले.   ताई तुमच्याविना आम्ही आयुष्यचा विचार सुद्धा केला नव्होता , तुमचं अस सोडून जाणं खूप मोठं दुःख देऊन गेलं ताई, आपलं घर तुमच्या विना पोरकं आहे आम्ही आमचं आयुष्य तुमच्याविना शून्य आहे ताई. तुमच अस हे जाण आम्हाला आयुष्यभरासाठी चटका देऊन गेला.
ताई आमच्या आयुष्यात तुमची कमी नेहमी भासत होती, भासत आहे आणि भासत राहीणार.
तुमची खूप आठवण येते ताई

*भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💔*