सोमवार, ७ मार्च, २०१६

जागतिक महिला दिन ... ८ मार्च


जागतिक महिला दिन ... ८ मार्च
आज जागतिक महिला दिन..!!! सर्वप्रथम मनात विचार आला की महिला दिन साजरा करायचे प्रयोजन काय असावे ?
 या दिवसाच्या निमित्ताने तरी तिला समाजात कुठेतरी स्थान मिळावे हे तर नाही ना ? पण मग लक्षात आले की जशी आपण थोरा- मोठ्यांची स्मृति मनात जपतो... त्याचप्रमाणे महिलांच्या कर्तृत्वाला हा salute आहे ....आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेतच ...पण त्याचबरोबर कुटुंब जपण्याचे मोठे काम फक्त महिलाच करू जाणे  !
फार पूर्वी स्त्रियानी फ़क्त चुल अणि मूल बघायचे आणि पुरुषानी प्रपंच चालवायचा हा अलिखित नियम होता। स्त्रिया फ़क्त उत्सव अणि समारंभ या निमित्तानेच घराबाहेर पडायच्या। त्या वेळीही गार्गी अणि मैत्रेयि सारख्या उच्च शिक्षित स्त्रिया होत्या... पण फारच कमी। पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले यानि स्त्री शिक्षणाची दालने योग्य अर्थाने खुली केलि।
त्यानंतर स्त्रियानी मागे बघितलेच नाही। प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आज पुरुषांच्या एक पाऊल पुढेच आहेत। अगदी अवकशापर्यंत पोचलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स , समाजसेविका मेधा पाटकर , डॉ.रानी बंग , पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या इंदिरा गाँधी , पुलिस क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या किरण बेदी ..... एक नव्हे तर कितीतरी नावे आपल्यासाठी आदर्शवत आहेत। आपले राष्ट्र निर्माण करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे। पण तितक्याच महान आहेत त्या राजमाता जिजाबाई... मनावरील संस्कार, त्याग, चातुर्य , बुद्धिमत्ता, वीरता , सामाजिक बांधिलकी या सर्व गुणांची देण त्यानी शिवरायाना सुपूर्त केलि। त्यानी शिवाजी महाराजाना घडविले , म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकले।
घराची गरज पूर्ण करण्यासाठी नोकरीनिमित्त बाहेर पडलेली स्त्री, करियर च्या कधी मागे लागली , ते समजलेच नाहीं... पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना , कदाचित आजच्या स्त्रीला याचा विसर पडतो आहे...की तिची सर्वात मोठी करियर म्हणजे चांगली पीढ़ी निर्माण करणे.... हे काम करण्यासाठी लागणारी त्याग, प्रेम, चिकाटी, सहनशीलता या गुणांची देण जेवढी स्त्री कड़े आहे तेवढी पुरूषाकडे नाही। आपल्या मुलांचे अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करून सुजाण नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा राष्ट्रकार्याला मदतच आहे। मुलांचा सर्वांगीण विकास करणे ही आज कालाची गरज आहे। उत्तम आरोग्य, योग्य शिक्षण , उत्तम संस्कार याचबरोबर सामाजिक बन्धिलाकिची जाणीव आजच्या पिढीत निर्माण करणे आज गरजेचे आहे।
खरी गरज आहे ती महिलेने दृष्टी बदलण्याची ... मग ती नविन सून असुदे की नवीन जन्मलेली मुलगी असुदे।
राम खीर खा...
सीता काम कर....
भुवन पाठशाला जा...
गीता पानी ला...
मदन बगीचे में खेल॥
मीना माँ की मदद कर...
हे बदलणे आपल्याच हातात आहे। अज या महिला दिनानिमित्त आपल्याला गुढी उभारायची आहे ती बदलाची... तरच खर्या अर्थाने आजचा महिला दिन साजरा होईल....

महिला दिन......गरज आहे ती प्रत्येक महिलेने आपला आत्म सन्मान जपण्याची...

ती  आई  आहे,...  ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ....ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ...ती जन्म आहे,
ती माया  आहे, तीच सुरुवात आहे, आणि  सुरुवात  नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना आधारवड परिवार व मासिक सैनिक दर्पण तर्फे हार्दिक शुभेच्छा..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा