शुक्रवार, ११ मार्च, २०१६

ध्यान (Meditation)

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

            ध्यानाचे फायदे

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
               ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे.

            स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...........

        वाईट सवयी नष्ट होतात 

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
              मन आनंदी होते

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

                 कार्यक्षमता वाढते 

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

झोपेचे तास कमी होतात

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

           दर्जेदार नातेसंबंध

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
                विचारशक्ती वाढते 

               आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.
               जीवनाचा उद्देश

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

ध्यान (Meditation) कसे करावे?

१.
शांत, निवांत खोली निवडावी.
२.
मंद प्रकाश योजना असल्यास उत्तम. भगभगीत प्रकाश नसावा. मंद वासाची उदबत्ती लावल्यास वातावरणनिर्मिती उत्तम होते. परंतु धुराची एलर्जी असल्यास वा अस्थमा त्रास असल्यास उदबत्ती टाळणे योग्य.
३.
सुखासन वा स्वस्तिकासनासारख्या सुखकारक आसनात बसावे. आरामखुर्चीत बसले तरी चालेल. १० ते १५ मिनिटे बसता येणे हीच आवश्यकता आहे. सुखासन वा स्वस्तिकासनात बसल्यास हात गुढघ्यावर सैल ठेवावेत.
पद्ममुद्रेप्रमाणे एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या ओंजळीत, अग्रबाहू मांडीवर स्थित (आधारासाठी) व अकृत्रिमपणे सरळ बसावे. हे शक्य नसेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालेल. हात खुर्चीच्या हातावर सैलसर ठेवावेत. शरीराची थोडीफार हालचाल चालते, पण मध्येच उठावयास लागल्यास मेडीटेशनचा भंग होतो,म्हणून खबरदारी घ्यावी.
४.
शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल करतो. इथे मात्रत्याविरुद्ध म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे.
५.
सुखेनैव आसनस्थित झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे. कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत, नंतर हात व पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य करावा. ह्या सर्व प्रकाराला एक ते दीड वा जास्तीत ज्यास्त दोन मिनिटे पुरे होतात.
६.
आता आपण बीज मंत्र मनातल्या मनात म्हणावा, ज्या योगे मनातील विचार बाजूस सारता येतील. बीज मंत्र म्हणावयाचा नसेल तर साक्षीभवना (Witnessing the mind) अभ्यास करावा. या योगे मन शांत रहाते त्याचा अनुभव घ्यावा.
७.
साक्षीभावनाही कठीण वाटत असेल तर हिमालायाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा.
८.
आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शावासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते. अन्यथा वेळ समजण्यासाठी घड्याळाचा गजर लावण्यास हरकत नाही.
९.
सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.

ध्यान का करावे?

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे  प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले.  ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमातj साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

सोमवार, ७ मार्च, २०१६

जागतिक महिला दिन ... ८ मार्च


जागतिक महिला दिन ... ८ मार्च
आज जागतिक महिला दिन..!!! सर्वप्रथम मनात विचार आला की महिला दिन साजरा करायचे प्रयोजन काय असावे ?
 या दिवसाच्या निमित्ताने तरी तिला समाजात कुठेतरी स्थान मिळावे हे तर नाही ना ? पण मग लक्षात आले की जशी आपण थोरा- मोठ्यांची स्मृति मनात जपतो... त्याचप्रमाणे महिलांच्या कर्तृत्वाला हा salute आहे ....आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेतच ...पण त्याचबरोबर कुटुंब जपण्याचे मोठे काम फक्त महिलाच करू जाणे  !
फार पूर्वी स्त्रियानी फ़क्त चुल अणि मूल बघायचे आणि पुरुषानी प्रपंच चालवायचा हा अलिखित नियम होता। स्त्रिया फ़क्त उत्सव अणि समारंभ या निमित्तानेच घराबाहेर पडायच्या। त्या वेळीही गार्गी अणि मैत्रेयि सारख्या उच्च शिक्षित स्त्रिया होत्या... पण फारच कमी। पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले यानि स्त्री शिक्षणाची दालने योग्य अर्थाने खुली केलि।
त्यानंतर स्त्रियानी मागे बघितलेच नाही। प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आज पुरुषांच्या एक पाऊल पुढेच आहेत। अगदी अवकशापर्यंत पोचलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स , समाजसेविका मेधा पाटकर , डॉ.रानी बंग , पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या इंदिरा गाँधी , पुलिस क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या किरण बेदी ..... एक नव्हे तर कितीतरी नावे आपल्यासाठी आदर्शवत आहेत। आपले राष्ट्र निर्माण करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे। पण तितक्याच महान आहेत त्या राजमाता जिजाबाई... मनावरील संस्कार, त्याग, चातुर्य , बुद्धिमत्ता, वीरता , सामाजिक बांधिलकी या सर्व गुणांची देण त्यानी शिवरायाना सुपूर्त केलि। त्यानी शिवाजी महाराजाना घडविले , म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकले।
घराची गरज पूर्ण करण्यासाठी नोकरीनिमित्त बाहेर पडलेली स्त्री, करियर च्या कधी मागे लागली , ते समजलेच नाहीं... पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना , कदाचित आजच्या स्त्रीला याचा विसर पडतो आहे...की तिची सर्वात मोठी करियर म्हणजे चांगली पीढ़ी निर्माण करणे.... हे काम करण्यासाठी लागणारी त्याग, प्रेम, चिकाटी, सहनशीलता या गुणांची देण जेवढी स्त्री कड़े आहे तेवढी पुरूषाकडे नाही। आपल्या मुलांचे अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करून सुजाण नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा राष्ट्रकार्याला मदतच आहे। मुलांचा सर्वांगीण विकास करणे ही आज कालाची गरज आहे। उत्तम आरोग्य, योग्य शिक्षण , उत्तम संस्कार याचबरोबर सामाजिक बन्धिलाकिची जाणीव आजच्या पिढीत निर्माण करणे आज गरजेचे आहे।
खरी गरज आहे ती महिलेने दृष्टी बदलण्याची ... मग ती नविन सून असुदे की नवीन जन्मलेली मुलगी असुदे।
राम खीर खा...
सीता काम कर....
भुवन पाठशाला जा...
गीता पानी ला...
मदन बगीचे में खेल॥
मीना माँ की मदद कर...
हे बदलणे आपल्याच हातात आहे। अज या महिला दिनानिमित्त आपल्याला गुढी उभारायची आहे ती बदलाची... तरच खर्या अर्थाने आजचा महिला दिन साजरा होईल....

महिला दिन......गरज आहे ती प्रत्येक महिलेने आपला आत्म सन्मान जपण्याची...

ती  आई  आहे,...  ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ....ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ...ती जन्म आहे,
ती माया  आहे, तीच सुरुवात आहे, आणि  सुरुवात  नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना आधारवड परिवार व मासिक सैनिक दर्पण तर्फे हार्दिक शुभेच्छा..!!!

८ मार्च - जागतिक महिला-दिन


८ मार्चक महिला-दिन - इतिहास

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.