बुधवार, १८ जुलै, २०१८

नवरा

आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा

*नवरा म्हणजे समुद्राचा*
*भरभक्कम काठ*
*संसारात उभा राहतो*
*पाय रोवून ताठ      ll*

*कितीही येवो प्रपंच्यात*
*दुःखाच्या लाटा*
*तो मात्र शोधीत राहतो*
*सुखाच्या वाटा   ll*   

*सर्वांच्या कल्याणा करता*
*पोटतिडकीने बोलत राहतो*
*न पेलणारं ओझं सुद्धा*
*डोक्यावर घेऊन चालत राहतो  ll*

*कधी कधी बायकोलाही*
*त्याचं दुःख कळत नसतं*
*आतल्या आत त्याचं मन*
*मशाली सारखं जळत असतं  ll*

*नवरा आपल्या दुःखाचं*
*कधीच प्रदर्शन मांडत नाही*
*खूप काही बोलावसं वाटतं*
*पण कुणाला सांगत नाही   ll*

*बायकोचं मन हळवं आहे*
*याची नवऱ्याला जाणीव असते*
*दुःख समजून न घेण्याची*
*अनेक बायकात उणीव असते  ll*

*सारं काही कळत असून*
*नवऱ्याला अपमान गिळावे लागतात*
*वेदनांना काळजात दाबून*
*पुन्हा कष्ट उपसावे लागतात    ll*

*सगळ्यांच्या आवडी जपता जपता*
*मन मारीत जगत असतो*
*बायको , पोरं खूष होताच*
*तो सुखी होत असतो  ll*

*इकडे आड तिकडे विहीर*
*तशीच बायको आणि आई*
*वाट्टेल तसा त्रास देतात*
*कुणालाच माया येत नाही ll*

*त्याने थोडी हौसमौज केली तर*
*धुसफूस धुसफूस करू नका*
*नवऱ्या विरुद्ध विनाकारण*
*दारू गोळा भरू नका  ll*

*दोस्ता जवळ आपलं मन*
*त्यालाही मोकळं करावं वाटतं*
*हातात हात घेऊन कधी*
*जोर जोरात रडावं वाटतं ll*

*समजू नका नवरा म्हणजे*
*नर्मदेचा गोटा आहे*
*पुरुषाला काळीज नसतं*
*हा सिद्धांत खोटा आहे  ll*

*मी म्हणून टिकले इथं*
*दुसरी पळून गेली असती*
*बायकोनं विनाकारण*
*नवऱ्याला धमकी दिलेली असती ll*

*घरात तुमचं लक्षच नाही*
*हा एक उगीच आरोप असतो*
*बाहेर डरकाळ्या फोडणारा*
*घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll*

*सारख्या सारख्या किरकिरीनं*
*त्याचं डोकं बधिर होतं*
*तडका फडकी बाहेर जाण्यास*
*खूप खूप अधीर होतं  ll*

*घरी जायचं असं म्हणताच*
*त्याच्या पोटात गोळा येतो*
*घरात जाऊन बसल्या बसल्या*
*तोंडात आपोआप बोळा येतो ll*

*नवरा म्हणा , वडील म्हणा*
*कधी कुणाला कळतात का ?*
*त्यांच्या साठी कधी तरी*
*कुणाची आसवं गळतात का ? ll*

*पेला भर पाणी सुद्धा*
*चटकन कुणी देत नाही*
*कितीही पाय दुखले तरी*
*मनावर कुणी घेत नाही  ll*

*वेदनांना कुशीत घेऊन*
*ओठ शिउन ' तो ' पडून राहतो*
*सर्वांच्या सुखासाठी*
*एकतारी भजन गातो  ll*

*बायको आणि मुलांनी*
*या संताला समजून घ्यावं*
*फार काही नकोय त्याला*
*दोन थेंब सुख द्यावं    ll*

*मग बघा लढण्यासाठी*
*त्याला किती बळ येतं*
*नवऱ्याचं मोठेपण हे*
*किती जणांच्या लक्षात येतं ? ll*
🌺🌺👏🌸🌸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा