रविवार, १३ मार्च, २०२२

प्रथम पुण्यस्मरण पुष्पाताई

नमस्कार आज मी आपणास माझ्या जीवनाला कलाटणी देण्याचे व आधार देऊन स्वालंबन जीवन जगण्यासाठी सक्षम करणाऱ्या एक आदर्शवत  महिलेची यशोगाथा शब्दांकन करण्याचा प्रयत्न करणार आहे नात्याला व मैत्री ला वयाचे बंधन नसते हे मला पुष्पा ताईंच्या स्नेहा तून जाणवले हे ऐकल्यानंतर स्वाभाविकपणे प्रत्येकाला या मूर्ती विषयी जाणून घेण्याची उत्सुकता झालीच असेल क्षणाची उसंत न घेता ताईंचा जीवन प्रवास कथित करते ताई आमच्या घराण्याला प्राप्त झालेलं दैवी रूपच होय जीवनात प्रत्येकानं दुसऱ्यांच्या जीवनात आनंद देण्यातच आपले सर्वस्व अर्पण केले पाहिजे यासाठी सदोदित कार्यान्वित राहिल्यात जीवन जगत असताना अनेक भूमिका बजावल्या उत्कृष्ट अर्धांगिनी माता सखी भगिनी कन्या विविध नात्यांच्या  भूमिका निभावल्या समाजाचे ऋण म्हणून उत्कृष्ट समाजसेविका वादातून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत यासाठी तंटामुक्ती तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा देखील होतात महिला स्वावलंबी बना व्यात यासाठी पतपेढीच्या संचालक म्हणून कार्यरत बालक ही देवाघरची फुले असतात अंगणवाडी सेविका म्हणून मुलांमध्ये रमान झाल्यात माझ्या जीवनात 1992 93 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती आयुष्यभर विसरणार नाही थोडक्यात एक उत्कृष्ट समाजसेविका कुटुंबवत्सल सर्वांसाठी महान विभूती यास प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन
श्रीमती सखुबाई गुरव, पवार 
पिंपळनेर,

ताईच्या आठवणी. प्रथम पुण्यस्मरण

ताईच्या आठवणी.
😭.. माझे आयुष्यातील सर्वात काळा दिवस 13..मार्च... काय काळ घेऊन आला होता ताईंची... ताईची. तब्येत ठीक नाही होती.. मी.. भाचा. त्याचे मित्र असे डॉक्टर कडे घेऊन जात असताना पाच. मिनिटे अंतर. दवाखाना होता ताई.. अभिजित.. त्याचे मित्र मी तेव्हाच ताईंनी दादा असा आवाज दिला अणि😭सर्व काही सुख एक मिनिटात हिरावून गेले.
ताई जरी बहीण होती पण माझी आई.. बाप.. असे भूमिका ती निभावून सर्व काही ठीक होत.. मुलगा.. आयटी इंजिनिअरिंग पास झाला खुप. जिद्दीने त्याला इंजिनिअर.. केल सर्व मजेत असताना.. ताई गेल्या.. ताई.
सारखी बहीण भेटणे म्हणजे खूपच नशीब लगत पण 😭. लोकांचे धुणी भांडी करून मी अणि लहान तीन बहिणी.. आई बाबा.. सर्वांना 1972..साली खूप दुष्काळ. होता.. तेव्हा धान्य मिळत नव्हते. ताई धुणीभांडी करून पाच घराची पाच भाकरी आणून सर्वांना खायला आणायची. ताईची जेवढी स्तुती करेन तेवढी कमीच आहे. असी माझी बहिण देवाने हिरावून घेतली
.😭ताईने उपकाराची फेड करूच दिली नाही...
खुप दुःख होत... ताई गेले पण लहान बहिण अतिदक्षता विभागात दाखल.. दोन दिवस नंतर जेव्हा विचारले की ताई कशी आहे आम्ही सांगायचे की ठीक आहे.. डोळ्यातून अश्रू सुद्धा. थांबायचे नाही पण देव आमची परीक्षा घेत होता. आम्ही सर्व अश्रू गिळून.. हसत उषाताई जवळ रहायचो.. असा काळा दिवस.. नको. दुःखात.. सुधा.. दुःख.. दिसू दिल नाही.... ताई तुमचे उपकार कसे फेडू 😭😭😭सांगा


बहीण असावी अशी तिचे.. कर्तुत्व..कसे. फेडू 😭😭😭😭😭

नरहरी हिरामण गुरव
निमडाळे

*🌺 प्रथम पुण्यस्मरण 🌺*आई... पुष्पाताई भागवत गुरव 2

*🌺 प्रथम पुण्यस्मरण 🌺*
आई...
१ वर्ष झाला आई तुम्हाला जाऊन...कोणी तरी खरं सांगितलं आहे *आयुष्य काय आहे हे तेव्हाच कळते जेव्हा आयुष्यात आईच्या मायेची आणि बापाच्या छायेची कमी भासते 😞* आई , जग कळायला लागल्यापासून तुम्हीच माझी आई आणि तुम्हीच माझे बाबा झालेत. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली. पण आई एक वर्षांपूर्वी अचानक आयुष्यात असं वादळ आलं की माझे सर्वस्व म्हणजेच तुम्हाला माझ्या पासून हिरावून नेलं. आई तुम्ही मला आयुष्याच्या अश्या अर्धवट वाटेवर सोडून जाणार अस कधीच वाटलं नव्हत, तुमच्या आशीर्वादाची तुमच्या मार्गदर्शनाची खूप जास्त आताच गरज होती आणि तेव्हाच तुम्ही आमची साथ सोडली. आई तुमच्याविना आयुष्य जगणं किती कठीण आहे , जबाबदाऱ्या घेऊन जगणं किती कठीण असत ह्या सर्व गोष्टी मला समजल्या. आई तुमची उणीव आयुष्यभर भरून निघणार नाही पण आई तुमच्या शिकवणी घेऊन तुमचे आशीर्वाद घेऊन आयुष्यात तुमच्या सर्व स्वप्नांना पूर्ण करू शकेल एवढेच मागणं तुमच्याकडे मागतो.
*विनम्र अभिवादन आईसाहेब 😞*
*भावपूर्ण श्रद्धांजली 💔*
           - शोकाकुल -
*श्रीमती. उषा भागवत गुरव*
*चि. अभिजित भागवत गुरव*
समस्त चव्हाण(गुरव)परिवार,धुळे 🙏


प्रथम पुण्यस्मरण - पुष्पाताई भागवत गुरव

*ताई.....💔*
आज पूर्ण १ वर्ष झाले ताई , १ वर्ष ताई , आयुष्याच्या वाटेवर मला तुम्ही एकटं सोडून गेलात...आयुष्याची सुरवात झाली ती तुमच्या सोबतच लहानपणा पासून तुम्ही आम्हा सर्व भाऊ-बहिणींना एका आई प्रमाणे सांभाळले , स्वतः उपाशी पोटी झोपून आम्हा भाऊ-बहिणीच्या पोटाची खळगी भरायचे. तेव्हा पासून माझ्या आयुष्याला तुमच्या आधाराची साथ भेटली. नंतर ताई, आपल्या छोट्याश्या परिवाराला सुरवात झाली आणि थोडे आनंदाचे क्षण येताच पुन्हा दुःख आपल्या दारी आलं पण तेव्हा एका खंबीर आधारप्रमाणे तुम्ही आपल्या घराची धुरा सांभाळली.
कोणा पुरुषाला सुद्धा लाजवेल असे कर्तृत्व आणि नेतृत्व तुम्ही केले, घर सांभाळत असताना आपल्या मुलावर हवे ते संस्कार केले घरच्या परिस्थितिची जाणीव करून दिली.  आणि पुन्हा एक वेळा आयुष्याच्या गोड क्षणाला आणि आनंदाला सुरवात झाली , आपले घर स्वर्गा सारखे झाले होते आणि तेव्हा परत काळाने आपल्यावर आपल्या आनंदावर घाला घातला.  ताई, काही न कळू देता , काही न समजू देता आपले होत्याचे नव्होते झाले...ताई तुम्हाला ह्या दुर्दैवी नशिबाने आमच्या पासून हिरावून नेले.   ताई तुमच्याविना आम्ही आयुष्यचा विचार सुद्धा केला नव्होता , तुमचं अस सोडून जाणं खूप मोठं दुःख देऊन गेलं ताई, आपलं घर तुमच्या विना पोरकं आहे आम्ही आमचं आयुष्य तुमच्याविना शून्य आहे ताई. तुमच अस हे जाण आम्हाला आयुष्यभरासाठी चटका देऊन गेला.
ताई आमच्या आयुष्यात तुमची कमी नेहमी भासत होती, भासत आहे आणि भासत राहीणार.
तुमची खूप आठवण येते ताई

*भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💔*

बुधवार, १८ जुलै, २०१८

नवरा

आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा

*नवरा म्हणजे समुद्राचा*
*भरभक्कम काठ*
*संसारात उभा राहतो*
*पाय रोवून ताठ      ll*

*कितीही येवो प्रपंच्यात*
*दुःखाच्या लाटा*
*तो मात्र शोधीत राहतो*
*सुखाच्या वाटा   ll*   

*सर्वांच्या कल्याणा करता*
*पोटतिडकीने बोलत राहतो*
*न पेलणारं ओझं सुद्धा*
*डोक्यावर घेऊन चालत राहतो  ll*

*कधी कधी बायकोलाही*
*त्याचं दुःख कळत नसतं*
*आतल्या आत त्याचं मन*
*मशाली सारखं जळत असतं  ll*

*नवरा आपल्या दुःखाचं*
*कधीच प्रदर्शन मांडत नाही*
*खूप काही बोलावसं वाटतं*
*पण कुणाला सांगत नाही   ll*

*बायकोचं मन हळवं आहे*
*याची नवऱ्याला जाणीव असते*
*दुःख समजून न घेण्याची*
*अनेक बायकात उणीव असते  ll*

*सारं काही कळत असून*
*नवऱ्याला अपमान गिळावे लागतात*
*वेदनांना काळजात दाबून*
*पुन्हा कष्ट उपसावे लागतात    ll*

*सगळ्यांच्या आवडी जपता जपता*
*मन मारीत जगत असतो*
*बायको , पोरं खूष होताच*
*तो सुखी होत असतो  ll*

*इकडे आड तिकडे विहीर*
*तशीच बायको आणि आई*
*वाट्टेल तसा त्रास देतात*
*कुणालाच माया येत नाही ll*

*त्याने थोडी हौसमौज केली तर*
*धुसफूस धुसफूस करू नका*
*नवऱ्या विरुद्ध विनाकारण*
*दारू गोळा भरू नका  ll*

*दोस्ता जवळ आपलं मन*
*त्यालाही मोकळं करावं वाटतं*
*हातात हात घेऊन कधी*
*जोर जोरात रडावं वाटतं ll*

*समजू नका नवरा म्हणजे*
*नर्मदेचा गोटा आहे*
*पुरुषाला काळीज नसतं*
*हा सिद्धांत खोटा आहे  ll*

*मी म्हणून टिकले इथं*
*दुसरी पळून गेली असती*
*बायकोनं विनाकारण*
*नवऱ्याला धमकी दिलेली असती ll*

*घरात तुमचं लक्षच नाही*
*हा एक उगीच आरोप असतो*
*बाहेर डरकाळ्या फोडणारा*
*घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll*

*सारख्या सारख्या किरकिरीनं*
*त्याचं डोकं बधिर होतं*
*तडका फडकी बाहेर जाण्यास*
*खूप खूप अधीर होतं  ll*

*घरी जायचं असं म्हणताच*
*त्याच्या पोटात गोळा येतो*
*घरात जाऊन बसल्या बसल्या*
*तोंडात आपोआप बोळा येतो ll*

*नवरा म्हणा , वडील म्हणा*
*कधी कुणाला कळतात का ?*
*त्यांच्या साठी कधी तरी*
*कुणाची आसवं गळतात का ? ll*

*पेला भर पाणी सुद्धा*
*चटकन कुणी देत नाही*
*कितीही पाय दुखले तरी*
*मनावर कुणी घेत नाही  ll*

*वेदनांना कुशीत घेऊन*
*ओठ शिउन ' तो ' पडून राहतो*
*सर्वांच्या सुखासाठी*
*एकतारी भजन गातो  ll*

*बायको आणि मुलांनी*
*या संताला समजून घ्यावं*
*फार काही नकोय त्याला*
*दोन थेंब सुख द्यावं    ll*

*मग बघा लढण्यासाठी*
*त्याला किती बळ येतं*
*नवऱ्याचं मोठेपण हे*
*किती जणांच्या लक्षात येतं ? ll*
🌺🌺👏🌸🌸

मंगळवार, १७ जुलै, २०१८

लग्नाचं वय

📎
*लग्नाचं वय.*

*सर्व मुलांनो मुलींनो व /त्यांच्या पालकांनो,*

कुठेतरी थांबायला शिका रे!! सर्वसाधारणपणे 18/19 व्या वर्षि मुलगी वयात येते.
या वयात साधारण दिसणाऱ्या मुलीही चांगल्या दिसतात. मुळातच सुंदर असल्या, तर त्या अधिकच छान रेखीव आकर्षक दिसतात.
विविध लग्नसमारंभात/कार्यक्रमात अशा मुली उठुन दिसतात आणि बऱ्याच वेळी अशा मुलींना आपणहुन चांगली स्थळे सांगुन येतात . विचारणा होते,

पण .

स्वतःहुन असे कुणी विचारले व जरी ते स्थळ चांगले असले तरी मुलीच्या बापाच्या डोक्यात वारं शिरतं. तो अचानक भाव खायला लागतो, "मुलीला अजुन शिकायचे आहे, करीयर करायचे आहे, स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे" असे सांगुन अशी चांगली चालत आलेली स्थळे टाळली जातात .

मग काय, मुलगीपण अभ्यासाला लागते. चांगली डिग्री मिळवते. तोपर्यंत ती २२/२३ वयाची होते. मग लगेच लग्नाचा विचार करायला हरकत नसते,

पण

नुसत्या डिग्रीने काय होते, अजुन उच्च शिक्षण घेतले म्हणजे अजुन मोठ्ठे तोलामोलाचे स्थळ मिळेल, असे म्हणुन परत शिक्षण सुरुच रहाते. तोपर्यंत मुली पंचवीशीच्या होतात. अभ्यास करुन करुन तब्बेत बिघडते. चेहऱ्यावरील गोडवा कमी होत जातो. (पुर्वीच्या पिढीत म्हणजे दहा पंधरा वर्षापुर्वीपर्यंत पंचविशीत पोरींना दोन एक पोर होवुन परत त्या मोकळे फिरायला मोकळ्या रहायच्या)

मग ,
मग आता पंचविशीत मुलगी नोकरीच्या शोधात व बाप स्थळाच्या शोधात निघतो.

बरे स्थळ शोधतांना किती किस काढावा?

सरकारी नोकरीच हवी, किंवा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर असावा, किंवा खुप खुप पगार असावा, तसेच त्याच्याकडे गाडी-फ्लॅट हवा, दिसायला चांगला हवा, वयात जास्त अंतर नको व अगदी कमीही नको, एकुलता एक शक्यतो नसावा, (सासु सासरे मग कायमच बोकांडी बसतील नां !) आई बाप मुलाजवळ रहाणारे नकोत, धंदेवाईक नको, शेतकरी नको, फक्त पुणे मुंबई बंगलोर सारख्या मेट्रो सिटीतच हवा किंवा US/UK त असावा.

काय काय म्हणुन अपेक्षा असाव्यात, याला मर्यादाच नाही. बरे सगळा तपास बाहेर बाहेरुनच चालतो. प्रत्येक स्थळात काही ना काही खोट काढत काढत पोरीचे वय २७/२८ वर येवुन पोहोचते. पोरगी नोकरी करायला लागली असेल तरी, किंवा नोकरी लागली नाही तरी, निसर्गनियमानुसार चेहऱ्याचे तेज कमी कमी होत जाते. तोलामोलाचे स्थळ मिळणे मुश्किल होत जाते. तरीसुद्धा अजुनही तडजोड करायची तयारी नसते. जिथे नोकरी करते, त्याच गावातील स्थळ हवे. आपल्यापेक्षा जास्त पगारवालाच हवा, या नादात वये वाढत जातात. मग केव्हातरी कुणालातरी उपरती होवुन २८/३० त लग्ने उरकली जातात. सगळ्यांचा उत्साह तोपर्यंत निघुन गेलेला असतो.

बरे २८/३0 त लग्ने होवुनही यांना मुलाबाळांची घाई नसते. अगोदर सगळे व्यवस्थित झाल्यावर किंवा दोनतीन वर्षा नंतर मुल आणायचे असे यांचे महान विचार. तोपर्यंत प्रकृतीचा/शरीराचा आकार पार बिघडुन गेलेला असतो.

मग

मग काय? सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मुलाचा विचार. ३४/३५ व्या वर्षी मुल. तोपर्यंत मुलीच्या आईचे/सासुचे वय ६० च्या पुढे. त्यांना स्वतःचेच सुधरत नाही, तर त्या काय पोरींचे बाळंतपण व पुढचे सोपस्कार काय करतील? पण करतात बिचाऱ्या स्वतःची ओढाताण करुन.

नंतर मग ,

मग काय ? ४/६ महीन्याचे बाळ आईच्या/सासुच्या देऊन चालल्या नोकरीवर. त्यांचाही नाईलाज व बाकीच्यांचाही.

खरे तर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या चांगल्या असतात. पण यांना कोण समजवणार??

म्हणुन कीं मुलि आणि मुलांनो

सर्व मुलींनोआणि मुंलांनो त्यांच्या पालकांनोआपल्या अपेक्षा कमी करा, काहीतरी तडजोड करुन कुठेतरी थांबायला शिका हो!!
आणि कुणि फोन करून चौकशि केलि तर एकमेंकाना घोळवत ठेवन्यापेक्षा जे कारन असेल ते स्षष्ट सांगत चला.
संसारात सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही मिळत. काहीतरी डावं उजवं होतचं.

*बघा पटतंय का ?*

*काही चुकीचे वाटल्यास क्षमा असावी.*
.
               *अॅड. सुरेन्द्र सोनवणे*

🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼

शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

राष्ट्रीय ग्राहक दिन

*भारतात *24*  *डिसेंबर हा* *दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून* *साजरा होत असतो*.

*भारतात याच दिवशी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला*.

*त्यामुळे हा दिवस ग्राहकांच्या संरक्षणाचा*,

*त्यांच्या हक्काचा, *त्यांच्या अधिकारांचा म्हणून गणला जात आहे. परंतु एक दिवसाचा दिन साजरा करून ग्राहकांचे प्रश्‍न सुटणार आहेत का*?

*त्यासाठी संबंधित संस्था, संघटना, शासन, प्रशासन आणि मुख्य म्हणजे समाज कोणत्या नजरेनं पाहतो, काय करू शकतो*?

*हे जाणून घ्यावे लागेल. ग्राहक हा बाजारातील राजा असल्याचे सातत्याने सांगितले जाते. *पण तो औट घटकेचा राजा आहे. त्यानंतर तो कायमचाच गुलाम झालेला असतो*.

*ही परिस्थिती बदलायची असेल तर ग्राहकाने स्वतःची निराशावादी भूमिका बदलायला हवी*.

*ग्राहक कोण राजा की गुलाम*?

बाजारात गेल्यानंतर दुकानदार आपल्याला अशा प्रकारे वागवतात की तो सन्मान पाहून आपल्या डोळ्यात अभिमानानं पाणीच यावं.

खरंतर तो आपल्याला उल्लू बनवत असतो.
आणि त्याहूनही खरं म्हणजे तो दुकारदारही याच समाजातला याच यंत्रणेचा एक भाग असतो. त्याला आपला माल खपवायचाच असतो. त्यामुळे तो आपल्याशी गोड बोलून व्यवहार करत असतो.

आपण स्वतःला त्या क्षणी राजा महाराजा असल्याचे समजतो. नंतर पैसे देऊन वस्तू घेऊन तिथून निघतो. त्याच वेळी ते महाराजापण संपलेलं असतं. त्या दुकानात पुन्हा गेलात तर पहिल्यासारखी ट्रीटमेंट मिळेलच याची खात्री कोणी देणार नाही. कारण, आता दुकानात आलेले नवे ग्राहक तिथला औट घटकेचा राजा झालेले असतात. 

ग्राहकांना उत्तम सेवा मिळाली  पाहिजे, असे वारंवार सांगितले जाते. पण भेसळ, महागाई, टंचाई, पैशाची चणचण, खरेदीतली अपरिहार्यता या आणि अशा अनेक कारणांमुळे उत्तम तर सोडाच, सेवाही कोणी देत नाही. त्यामुळे भारतीय बाजारपेठा आता राजाशिवाय, राजाला देण्यात येणार्‍या महत्त्वाशिवाय फुलताहेत.

आता तुम्ही या, काय  पाहिजे ते घ्या, पैसे द्या आणि फुटा अशी मानसिकता बाजाराची झाली आहे. त्यात सुपरमार्केट आणि मॉल्ससारखी तांत्रिक बाबींना जास्त महत्त्व देणारी सुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीचे जनरल स्टोअर, ठरलेले दुकान, घरच्यांची चौकशी करणारा दुकानदार वगैरे संकल्पना काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

या गोष्टी केवळ वस्तू खरेदीपुरत्या नसून आता तर कर, वीज बिले, गॅस देयके, स्टेशनरीपासून ते अगदी मोबाइल रिचार्जपर्यंत अनेक गोष्टींमध्ये कृत्रिमता आली आहे. सध्या कॅशलेसचा जमाना आल्याची हाकाटी पिटली जात आहे. ऑनलाइन व्यवहारांना गती आली आहे. त्यामुळे ग्राहक व विक्रेत्यांचे सलोख्याचे संबंध आता दुरावले गेले आहेत.

याही परिस्थितीत ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचा दावा अनेक उत्पादक, विक्रेते, दुकानदार, वितरक वगैरे करत असतात. घराच्या खरेदीपासून ते चप्पलच्या शिलाईपर्यंत सगळीकडे केवळ भुलवण्याचा उद्योग सुरू आहे. आजकाल प्रॉडक्ट सेलिब्रेटी, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, लोगो, रजिस्ट्रेशन, फ्रँचाईजी, सब-ब्रँच वगैरे शब्दांनी ग्राहकांना मोहात पाडले जात आहे. खाद्यपदार्थ, कपडे, अन्न-धान्य, जिन्नस, दैनंदिन वापराच्या वस्तू, देयके, कर वगैरे सगळीकडे मोहमायेचा पसारा मांडलेला आहे. त्यातून सूट, सवलत, यावर ते फ्री वगैरे प्रलोभने आहेतच.

ती काही वाईट नाहीत.

पण, ग्राहकांची मानसिकता एकाच गोष्टीभोवती फिरवत नेण्याचा हा फंडा काहीसा चुकीचा आहे. ग्राहक अकारण नको त्या वस्तू खरेदी करून पैसे उडवत असतो किंवा गुंतवत असतो. त्याला वेळेचे, वस्तूचे, पैशाचे व नियोजनाचे भान राहत नाही. 

आजकाल ऑनलाइन वस्तू खरेदीवर भर दिला जात आहे. लोकांना मार्केटमध्ये जाऊन वस्तू खरेदी करायला सवड नाही.

ते मोबाइल किंवा संगणकावरून इंटरनेटच्या माध्यमातून बाजारहाट करतात. ज्या वस्तू हाताळल्या नाहीत, त्या खरेदी केल्या जातात. त्या वस्तू कुरिअरने येतात.

अनेकदा त्यांची काही गॅरेंटी नसते.

कपडे, दागिने, मोबाइल, पुस्तके, भेटवस्तू वगैरेंची खरेदी ऑनलाइनवर मोठ्या प्रमाणात होते. अनेकदा लोक त्या वस्तू घेऊन फसतात.

तक्रार दाखल केली की उत्पादक, विक्रेते, कुरिअरवाले एकमेकांकडे बोट दाखवून आपली बाजू सावरून धरतात.

म्हणजे ग्राहकाला फसवले जाते. 
कित्येकदा वस्तूंवर कंपनीची नोंदणी नसते, उत्पादक नोंदणी, वस्तूच्या निर्मितीची तारिख, एक्स्पायरी डेट वगैरे काही नसतं.

विशेषतः अन्न-धान्याच्या बाबत असे आढळते. अशा वेळी ग्राहकांनी सावध राहून या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये कित्येकदा भेसळ आढळते.

त्या भेसळीमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खाद्यान्नांच्या वेष्टनांवरील माहिती ही महत्त्वाची असते. ती वाचून घेतली पाहिजे. घाईघाईत वस्तू खरेदी करणे हानीकारक ठरू शकते.

जाहिरातीत जे म्हटलं आहे, ते जाणून घ्या. तशाच प्रकारचं उत्पादन आपण खरेदी केलं आहे की नाही, ते तपासा. म्हणजे नुकसान होणार नाही. 

जाहिरातीत आपले आवडते स्टार असतात. त्यांचं म्हणणं हे आपल्यासाठी नसतंच. ते त्या कामाचे पैसे घेत असतात. आपण मात्र सतर्क राहिले पाहिजे. नुकसान झाले तरी आपण गप्प बसतो. ते चुकीचे आहे. तक्रार करायला कचरू नका. त्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यान्वये अनेक मार्ग आहेत. संकेतस्थळं आहेत. ती जाणून घ्या.

*राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

हळद आणि कुंकू यांचे पूजेतील महत्त्व...

हळद आणि कुंकू यांचे पूजेतील महत्त्व...

१) हळदी ला स्वतः चे एक सुंदर सुगंध असते.
वातावरणातील देवी देवतांच्या दैवी लहरी  सर्वात जास्त आकर्षित करण्याची शक्ती हळदी मध्ये असते.
हळदी मुळे दैवी उर्जेतील रज-तम घटकांचे सक्रिय वलय निर्माण होते.
हि दैवी उर्जा या वलयाच्या  आसपास च्या वातारणात पसरते.
हळदी मध्ये पृथ्वी चे मूळ घटक जास्त प्रमाणात आढळतात.
यामुळे हळदी च्या सुगंधाद्वारे हि उर्जा आसपास च्या वातावरणात पसरते.हळदी मध्ये पृथ्वी चे Frequencies जास्त प्रमाणात आढळतात. तसेच यात श्री गणपतीतत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे.

2) कुंकू: शुद्ध कुंकू हे हळदी पासून च बनवले जाते. या कुंकू चा रंग एकदम च लाल किंवा रक्तासारखा लाल आजिबात नसतो. हा किंचित डार्क नारंगी रंगाप्रमाणे असतो.
कुंकू मध्ये आढळणारी दैवी उर्जा त्याचा भोवती तयार झालेल्या सक्रिय वलया भोवती फिरत असते.यातून च कुंकू मध्ये आढळणारे चैतन्य आसपास च्या वातावरणात पसरते.
देवी देवतांना लावलेल्या कुंकू मधून सतत दैवी उर्जे चे उत्सर्जन होत असते म्हणून च कुंकू ला स्वतः चे असे एक आध्यात्मिक महत्त्व आहे.
कुंकू हे हळदी पासून बनविले जाते म्हणून च साहजिक च यात पृथ्वी चे Frequencies जास्त प्रमाणात आढळतात.
लाल रंग श्री दुर्गा देवी ला अत्यंत प्रिय आहे.
कुंकू च्या लाल रंगामुळे यात श्री दुर्गा देवीतत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते.
म्हणून च कोणत्याची देवी च्या कुम्कुमार्चना पूजे साठी शुद्ध कुंकू वापरणे इष्ट ठरते.
कुंकू मधील दैवी उर्जे मुळे उपासाकाच्या/ साधकाचे मानसिक शुद्धीकरण होते.कपाळावर कुंकू लावल्याने नकारात्मक उर्जा आपल्या पासून दूर राहतात.
म्हणून च स्त्री ने कपाळावर कुंकू लावणे इष्ट मानले जाते.

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा माहिती

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा माहिती

दि 31-10-2016 रोज सोमवार बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतॊ. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पती आणि माहेरच्या व सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

बलिप्रतिपदेला भगवान विष्णुंच्या वामन अवताराची पूजा करतात. बळी हा असुर राजा होता. त्याला त्याच्या पदाचा खूप गर्व झाला होता त्याला त्याच्या अहंकाराची शिक्षा देण्यासाठीच भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याला पाताळ लोकी पाठविले. काही समाज कंटक श्री विष्णुंच्या वामनावताराने गर्वहरण केलेल्या बळीला शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणतात परंतु शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणजे खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम हा आहे त्याची हत्यारे सुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहे.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी
अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र
काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे
म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात
कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा
करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली
जाते. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी
विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त
आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही
नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून
व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या
कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द-खतावणीच्या
नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता
वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला
औक्षण करते व पती पत्‍नीला ऒवाळणी घालतो.
नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात.
ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो
त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच
असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो
शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ
नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल
तसे वागू लागतात. बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा
भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा
लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे
म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले,
‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे
आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी
वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व
पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने
‘‘तिसरा पाय कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा
म्हणाला, ‘‘तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय
त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून
वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे
त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व
राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले
टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य
म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्‍याला यमयातना होऊ
नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास
करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि
कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.