शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

ओवाळणी। - श्री विश्वासराव भामरे आण्णा, धुळे


आज ताईच्या हातचे अभ्यंगस्नान ज्यांचे नशिबी ते खरोखरच भाग़्यशाली!
कारण आई नतंर अंगावरून खरा मायेचा हात फिरत असेल तर तो ताईचाच.
पुर्वी ओवाळणित सर्वस्व अर्पण करणारे भाऊ.
अन
भावांची फक्त प्रेमाची साडी चोळी मागणाय्रा बहिणी यांच्या सुरस कथा तुम्ही आम्ही ऐकल़्या .
बहिण जो पर्यत मायेचा हात देतेय ; तो पर्यंत तिचे प्रेम कळत नाही .ती जेव्हा तिच्या
मा़येचा हात काढून घेते तेव्हाच तिच्या प्रेमाचे मोल कळते.
बहिणी साठी रडणारे मी पाहिलेत.
कारण हे नातेच कच्या सुतासारखे आहे.ति आपली असतांना ती हक्काने दुसय्रा घरी नांदा़ला जाते व परकी होते.
मात्र एखाद्याने तिला डिवचले तरच ती नागीन होते.व सातबाय्रावर लक्ष ठेवते.
मी मात्र दोन पिढ्या अनुभवल्या.
एक म्हणजे आमच्या आत्याचा भावावरिल प्रेंमाचा वर्षाव.
अन माझ्यावरिल माझ्या आक्काच्या प्रेमाचा ओलावा.
तो घरात कायम जाणवतो.
अशा या पवित्र प्रसंगी ओवाळून घेतांना जी शरिरात नव चैतण्याची प्रेरणा जाग्रृत होते.तिचा अनुभव आज घेणारा खरोखरच भाग्यशाली.
आज या भावाबहिणींना हार्दिक शुभेच्छा.!
शुभ दिनाच्या शुभ शुभेच्छा.
जय शंभो!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा